महात्मा गांधी महाविद्यालयात जागतिक महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:21+5:302021-03-09T04:39:21+5:30
यावेळी प्राचार्य खालसा यांनी अमेरिकेतील कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी १९०८ ला पगारवाढ व कामाचे तास कमी करण्यासाठी प्रत्यक्ष न्यूयाॅर्कच्या ...
यावेळी प्राचार्य खालसा यांनी अमेरिकेतील कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी १९०८ ला पगारवाढ व कामाचे तास कमी करण्यासाठी प्रत्यक्ष न्यूयाॅर्कच्या रस्त्यावर उतरून आंदोलन केले. त्यानंतर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, स्वीत्झरलँड व इंग्लंडमध्ये महिलांना मतदानाच्या अधिकाराचे व स्त्री-पुरुष भेद नष्ट करण्याचे आंदोलन झाले. या आंदोलनाची आठवण म्हणून संयुक्त राष्ट्रसंघाच्या महिला विभागाने ८ मार्च हा दिवस महिलांचा आदोलन दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. त्यानंतर जगात अनेक देशात महिला संघटना स्थापन होऊन संघटितपणे हक्क मागण्याची परंपरा सुरू झाली. आज जागतिक स्तरावर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडी मिळवून स्वतःची क्षमता सिद्ध केली असली तरी या दिनानिमित्त महिलांना आपल्या न्याय्य हक्क मागणीची प्रेरणा मिळते असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. सीमा नागदेवे यांनी केले तर आभार प्रा. सुनंदा कुमरे यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. ज्ञानेश्वर ठाकरे, प्रा. दिलीप घोनमोडे, किशोर कुथे, शीला घोडीचोरे यांनी सहकार्य केले.