मराठी राजभाषा दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:43 AM2021-03-01T04:43:18+5:302021-03-01T04:43:18+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सागर म्हशाखेत्री हाेते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका स्मिता लडके, शिक्षिका हेमलता मुनघाटे, छाया जाॅर्ज ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सागर म्हशाखेत्री हाेते. तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षिका स्मिता लडके, शिक्षिका हेमलता मुनघाटे, छाया जाॅर्ज उपस्थित हाेते. भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणजे आपली मातृभाषा हाेय. कुसुमाग्रजांनी आपल्या साहित्यातून सांस्कृतिक वारसा दिला आहे, असे प्रतिपादन प्राचार्य सागर म्हशाखेत्री यांनी केले. पर्यवेक्षिका लडके यांनी संजीवनी बाेकील यांच्या आर्जव कवितेचे वाचन केले. हेमलता मुनघाटे यांनीही मनाेगत व्यक्त केले तर छाया जाॅर्ज यांनी ना. घ. देशपांडे यांच्या कवितेचे गायन केले. विद्यार्थ्यांनीही निवडक कवितांचे वाचन केले. सूत्रसंचालन सुचिता चाैधरी यांनी केले.
महात्मा गांधी महाविद्यालय, आरमाेरी
येथे कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा गाैरव दिन म्हणून शनिवारी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा हाेते. यावेळी उपप्राचार्य डाॅ. चंद्रकांत डाेर्लीकर, प्रा. डाॅ. अमिता बन्नाेरे, प्रा. शेखर बन्नाेरे, प्रा. नाेमेश मेश्राम, प्रा. पराग मेश्राम, लक्ष्मण निमजे, प्रा. डाॅ. विजय रैवतकर उपस्थित हाेते. मराठी भाषा वृद्धिंगत हाेण्यासाठी विद्यापीठांनी सर्व विद्या शाखांचे अभ्यासक्रम तांत्रिक शब्दांना पर्यायी शब्द निर्माण करून विद्यार्थ्यांपुढे सादर केले तर मराठी भाषेला वैभवाचे दिवस येऊ शकतात, असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. लालसिंग खालसा यांनी केले. प्रा. नाेमेश मेश्राम यांनीही मनाेगत व्यक्त केले.
यशस्वीतेसाठी प्रा. गजानन बाेरकर, डाॅ. वसंता कहालकर, विजय गाेरडे, मनाेज ठवरे, प्रा. सीमा नागदेवे, सुनंदा कुमरे, स्नेहा माेहुर्ले, अनिल राऊत, वैभव पडाेळे, सतेंद्र साेनेटक्के, डाॅ. ज्ञानेश्वर ठाकरे, गजेंद्र कढव, प्रा. दिलीप घाेनमाेडे, हिरालाल मगरे, प्रशांत दडमल, बाबूराव शेंडे यांनी सहकार्य केले.