सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:32 AM2021-03-14T04:32:03+5:302021-03-14T04:32:03+5:30

शहरातील प्रभाग क्र. १२ मधील झाशीराणीनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत चंद्रपूर रोड ते मारकवार ...

Cement concrete drain construction groundbreaking | सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाचे भूमिपूजन

सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाचे भूमिपूजन

googlenewsNext

शहरातील प्रभाग क्र. १२ मधील झाशीराणीनगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत चंद्रपूर रोड ते मारकवार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिट नाली बांधकामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते १२ मार्च रोजी करण्यात आले. याप्रसंगी त्या बाेलत हाेत्या. ३०० मीटर लांबीच्या रस्त्यालगतच्या नाली बांधकामासाठी १२ लाख १५ हजार ४६५ रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. नाली बांधकामामुळे परिसरातील नागरिकांसाठी साेयीचे हाेणार आहे. भूमिपूजन कार्यक्रमाला न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, बांधकाम सभापती प्रवीण वाघरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका वर्षा बट्टे, नगरसेवक ॲड.नितीन उंदीरवाडे, वासुदेव बट्टे, वर्षा चौधरी, शशिकला मारकवार, सत्यवती बेझनवार, रेखा इंगुलवार, गणेश बच्चलवार, राजेश तुम्मावार, नेहाल लोणारे, कंत्राटदार किरण सुंकरीवार, अक्षय रायपूरकर यांच्यासह वाॅर्डातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Cement concrete drain construction groundbreaking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.