गणेशनगरात सिमेंट काँक्रीट रस्ता, नालीकामाचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:27 AM2021-05-29T04:27:08+5:302021-05-29T04:27:08+5:30
यावेळी शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास होत असून प्रभाग क्र. ७ मध्येही विकासकामांवर भर देण्यात आला असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष पिपरे ...
यावेळी शहरातील प्रत्येक प्रभागाचा विकास होत असून प्रभाग क्र. ७ मध्येही विकासकामांवर भर देण्यात आला असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष पिपरे यांनी केले. सदर रस्ता व नाली बांधकामाची अंदाजित रक्कम १४ लाख ८२ हजार १०० रुपये एवढी असून, १२० मीटर लांबीचे बांधकाम आहे.
मागील चार वर्षांत या प्रभागामध्ये दलितवस्ती सुधार योजनाअंतर्गत नऊ लाख ३८ हजार रुपयांचे नालीवर फरशी टाकण्याचे काम करण्यात आले. ४८ लाखांचे सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करण्यात आले. २७ लाखांचे रस्ता खडीकरण करण्यात आले. ३० लाखांचे सिमेंट काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम करण्यात आले असून, ११ लाखांचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करून पूर्ण करण्यात आलेले आहेत. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत खुल्या जागेचे सौंदर्यीकरण करण्यात आले असल्याचे नगराध्यक्ष पिपरे यांनी यावेळी सांगितले.
भूमिपूजन कार्यक्रमाला नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेवक भूपेश कूळमेथे, रवींद्र घोंगडे, अविनाश विश्रोजवार, कंत्राटदार माजिद सय्यद यांच्यासह वाॅर्डातील नागरिक उपस्थित होते.