ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:40 AM2019-02-14T01:40:23+5:302019-02-14T01:42:42+5:30

अनुसूचित जाती- जमातींप्रमाणे ओबीसींची जातनिहाय आकडेवारी घोषित करून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Census of OBCs | ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा

Next
ठळक मुद्देमहासंघाची मागणी : देसाईगंजच्या एसडीओंमार्फत राष्ट्रपतींना पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : अनुसूचित जाती- जमातींप्रमाणे ओबीसींची जातनिहाय आकडेवारी घोषित करून लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघ देसाईगंजच्या वतीने राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मंडल आयोगाच्या १३ व्या शिफारशींनुसार ओबीसीना २७ टक्के आरक्षण १९९२ ला देण्यात आले. बहुसंख्य समाजाची जातनिहाय जनगणनेची आकडेवारी नसल्याने ओबीसी समाजाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळत नाही. त्यामुळे ओबीसी समाजाची सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक स्थिती हलाखीची आहे. बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यामध्ये ५० टक्केच्यावर ओबीसी समाज असूनही त्यांचे आरक्षण कमी करून १९ टक्यावरून ६ टक्के करण्यात आले. जिल्हात बहुतांश गावात गैरआदिवासी बहुसंख्येने असताना देखील सदर गाव पेसामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे बहुसंख्य गैर आदिवासी असलेली गावे पेसातून वगळावी. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सोय उपलब्ध करावी. तसेच त्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती द्यावी, इतरांप्रमाणे ओबीसी विद्यार्थ्यांनासुद्धा स्वाधार योजना लागू करावी. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण द्यावे, नॉन - क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश होता. सदर मागण्या पूर्ण न झाल्यास ओबीसी समाजातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने देण्यात आला.
निवेदन देताना जि. प. सदस्य रमाकांत ठेंगरे, लोकमान्य बरडे, सागर वाढई, नितीन राऊत, सुनील पारधी कमलेश बारस्कर, कैलास पारधी, प्रा. दामोधर सिंगाडे, हिरालाल शेंडे, चक्रधर पारधी, गौरव नागपूरकर, शंकर पारधी, नेताजी सुंदरकर, रामजी धोटे, दीपक प्रधान, प्रा. परशुरामकर, सतीश खरकाटे, ज्ञानेश्वर कावासे, शालिकराम नाकतोडे, मोहन बगमारे, प्रमोद झिलपे यांच्यासह बहुसंख्य ओबीसीबांधव उपस्थित होते.

Web Title: Census of OBCs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.