शताब्दी महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:55 PM2017-12-10T23:55:51+5:302017-12-10T23:56:19+5:30
येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या दोन दिवसीय शताब्दी महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
चामोर्शी : येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या दोन दिवसीय शताब्दी महोत्सवाचा समारोप रविवारी करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात शाळेतील माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. देवराव होळी होते. कार्यक्रमाला जि. प. अध्यक्ष योगिता भांडेकर, प्र. सो. गुंडावार, बाळासाहेब दीक्षित, माजी उपसभापती केशव भांडेकर, न. पं. उपाध्यक्ष राहूल नैैताम, रामेश्वर सेलुकर, माणिक तुरे, शाळा समिती अध्यक्ष साईनाथ बुरांडे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, न. पं. सभापती अविनाश चौधरी, गटनेता प्रशांत येगलोपवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष निकेश नैैताम, प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, नगरसेविका रोशनी वरघंटे, नगरसेवक विजय गेडाम, विशेष दोषी, रेवनाथ कुसराम, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, विनोद पेशट्टीवार, सुनंदा पाटील, विजय दुधबावरे, नरेश अल्सावार, माधवी पेशट्टीवार, मदन नैैताम, देवाजी बुरांडे, सोरते, बंडावार, सुखदेव नैैताम, मधुकर भांडेकर उपस्थित होते. दरम्यान माजी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. संचालन राकेश खेवले, प्रास्ताविक लालाजी मारडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी राजेश बाळराजे, तुषार चांदेकर, पी. आर. दुधबळे, व्ही. एस. मुळे, पी. जे. लंजे, संजय चांदेकर, धाईत, गुंडावार, एस. एस. कोडापे यांनी सहकार्य केले.
यांचा झाला सत्कार
समारोपीय कार्यक्रमात सुनंदा पाटील, रोशनी वरघंटे, अविनाश चौधरी, देवाजी बुरांडे, मदन नैैताम, बंडावार, सोरते, दिलीप चलाख, छाया कोहळे, प्रतिभा गजपुरे, राहूल नैैताम, माणिक तुरे, बाबुराव धोडरे, विकास दुधबावरे, प्रवीण नैैताम, कवडू आर्इंचवार, सुधाकर पालारपवार, दत्तू आमगावकर, स्वप्नील वरघंटे, सीताराम भोयर, रवी बोमनवार, प्रशांत येगलोपवार, उमाकांत सोमनकर, देवाजी बारसागडे, मोरेश्वर चलकलवार, निकू नैैताम, राकेश खेवले, डोमदेव बुरे, केशव पडालवार आदींचा सत्कार झाला.