केंद्र व राज्य शासनाचे धोरण जनविरोधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 11:40 PM2018-09-06T23:40:04+5:302018-09-06T23:41:18+5:30
केंद्र व राज्यात भाजप नेतृत्त्वातील सरकार सत्तारूढ झाल्यापासून आत्तापर्यंत लोकहिताची योजना अंमलात आणली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही योग्य निर्णय घेतला नाही. मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज सरकारने माफ केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र व राज्यात भाजप नेतृत्त्वातील सरकार सत्तारूढ झाल्यापासून आत्तापर्यंत लोकहिताची योजना अंमलात आणली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही योग्य निर्णय घेतला नाही. मोठमोठ्या उद्योजकांचे कर्ज सरकारने माफ केले. परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे शेतकरी, युवक व सर्वसामान्य जनता त्रासली आहे. केंद्र व राज्य सरकारचे धोरण जनविरोधी आहे, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.
गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमादरम्यान आ. विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नितीन कोडवते, यांच्या मार्गदर्शनात अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश कार्यकर्त्यांचे आ. विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केले. आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल, असा आशावाद आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. यावेळी अॅड. राम मेश्राम, प्रभाकर वासेकर, डॉ. नितीन कोडवते, कुणाल पेंदोरकर, आरिफ कानोजे, कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, संदीप पुण्यपवार, संकेत बल्लमवार उपस्थित होते.
यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये आनंदराव नैताम, कुलदीप लोणारे, विकास जुवारे, कालिदास जेंगठे, लोमेश गुरनुले, सचिन बारसागडे, लोकेश खोब्रागडे, अक्षय सोनटक्के, मनोज चिकराम, अतुल कोहपरे,सागर सोनटक्के, महेश लटारे, रमजान शेख, शाहरुख शेख, शरफराज शेख, अतुल चीचमलकार, मोहीम कुरेशी, मुन्ना रामटेके, भाष्कर ठाकरे, अविनाश कायरकर, तुषार मडावी, नागेश शिडाम, अतुल लाटीलवार, अमोल भांडेकर, सुरज मेश्राम, अरविंद भोपये, तेजराम रायशीडाम, प्रशांत पेंदाम, निकेश पेंदाम, ज्ञानेश्वर कोडाप, लिंगाजी बांगरे, राहुल मेश्राम यांचा समावेश आहे.