पदोन्नती आरक्षणाविषयी केंद्र व राज्य सरकार उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:43 AM2021-09-07T04:43:43+5:302021-09-07T04:43:43+5:30
आरक्षण हक्क कृती समितीतर्फे गडचिरोली येथील संविधान सभागृहात ‘संविधानिक आरक्षण व पदोन्नती आरक्षण विषयक केंद्र-राज्य सरकारची भूमिका’ या विषयावर ...
आरक्षण हक्क कृती समितीतर्फे गडचिरोली येथील संविधान सभागृहात ‘संविधानिक आरक्षण व पदोन्नती आरक्षण विषयक केंद्र-राज्य सरकारची भूमिका’ या विषयावर डॉ.सुरेश माने बाेलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य फरेंद्र कुतीरकर हाेते. विशेष अतिथी म्हणून कास्ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्याध्यक्ष अरुण गाडे, मुख्य संयोजक गौतम मेश्राम उपस्थित होते. याप्रसंगी अरुण गाडे यांनी केंद्र व राज्य सरकार आरक्षणविरोधी असून, मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर गप्प बसल्याची टीका केली.
संचालन माळी समाज संघटनेचे अशोक मांदाडे, प्रास्ताविक गौतम मेश्राम तर आभार सदानंद ताराम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आरक्षण हक्क कृत्ती समितीचे देवानंद फुलझेले, देवेंद्र सोनपिपरे, धर्मानंद मेश्राम यांच्यासह श्याम रामटेके, कास्ट्राइबचे अध्यक्ष विजय बन्सोड, आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनचे सदानंद ताराम व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.