केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी साधला नगराध्यक्षांसह नगरसेवकांशी संवाद
By admin | Published: December 28, 2016 03:00 AM2016-12-28T03:00:36+5:302016-12-28T03:00:36+5:30
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे भेट देऊन स्थानिक विश्राम भवनात
गडचिरोली : केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे भेट देऊन स्थानिक विश्राम भवनात भाजपच्या नगराध्यक्ष योगीता प्रमोद पिपरे यांच्यासह भाजपच्या २१ नगरसेवकांशी संवाद साधला.
जनतेने भाजपला विकासासाठी संधी दिली आहे. आपण सर्वांनी गडचिरोली शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत. केंद्र व राज्य सरकार आवश्यक त्या सर्व गोष्टीची मदत करेल, असे यावेळी नामदार अहीर म्हणाले. याप्रसंगी खासदार अशोक नेते, भाजपचे जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, प्रशांत वाघरे, चंद्रपूरचे माजी नगरसेवक फुलझेले तसेच नवनिर्वाचित नगरसेवक अनिल पांडुरंग कुनघाडकर, वर्षा अरविंद नैताम, प्रविण पुंडलिक वाघरे, रितू रूपेश कोलते, गुलाबराव गणपतराव मडावी, अनिता अविनाश विश्रोजवार, लता देवाजी लाटकर, अल्का अनिल पोहोणकर, निमा नेमाजी उंदीरवाडे, माजी नगराध्यक्ष भुपेश उमाशंकर कुळमेथे, मंजुषा नामदेव आखाडे, माजी बांधकाम सभापती आनंद नामदेवराव श्रृंगारपवार, वैष्णवी विलास नैताम, मुक्तेश्वर पुंजाराम काटवे, गीता उमेश पोटावी, केशव नामदेव निंबोळ, रंजना शंभूविधी गेडाम, संजय गोपाळ मेश्राम, अॅड. नितीन शांताराम उंदीरवाडे, पुजा दुर्योधन बोबाटे, वर्षा वासुदेव बट्टे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी नामदार हंसराज अहीर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगीता पिपरे व नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व गडचिरोली शहर विकासासाठी त्यांना प्रोत्साहित केले. याप्रसंगी प्रकाश अर्जुनवार, संजय बारापात्रे, हेमंत राठी यांच्यासह भाजपचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लायड्स मेटल कंपनीच्या उत्खनन कामावर नक्षलवाद्यांनी हल्ला करून तेथे ७६ ट्रकसह ७९ वाहनांची जाळपोळ केली. या घटनेनंतर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी गडचिरोली येथे या घटनेचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकीला खासदार अशोक नेते, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट उपस्थित होते. अहीर यांनी या जळीतकांडातील सर्व पैलूंची माहिती जाणून घेतली या ठिकाणी आवश्यक ती सुरक्षा प्रदान करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचना दिली. बऱ्याच कालावधीनंतर गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून मोठी घातपाती घटना घडल्याने अहीर यांनी यावेळी चिंता व्यक्त केली.