अंकिसाच्या आरोग्य केंद्राला सीईओंची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:34 AM2021-03-06T04:34:34+5:302021-03-06T04:34:34+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, बी.पी, शुगर, इतर औषधे तसेच जन्म नोंद वेळेवर ग्रामपंचायतमध्ये होत नसल्याची तक्रार व प्राथमिक ...
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, बी.पी, शुगर, इतर औषधे तसेच जन्म नोंद वेळेवर ग्रामपंचायतमध्ये होत नसल्याची तक्रार व प्राथमिक आरोग्य केंद्रात होत असलेल्या दुरुस्तीचे बांधकाम व आदी कामाबद्दल नागरिकांनी सीईओ यांना निवेदन देण्यात आले.
वीज पुरवठा खंडित झाल्यावर रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्याकरिता जनरेटरची सुविधा करावी, दवाखान्यात औषध वेळेवर उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेर औषधे घ्यावी लागत असल्याने रुग्णांना आर्थिक नुकसान होत आहे. यावर चर्चा करण्यात आली असून आराेग्य केंद्रातील समस्या लवकरात लवकर पूर्ण करीन, असे आश्वासन कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांना दिले.
यावेळी पंचायत समिती सदस्य प्रभाकर शानगोंडा, ग्रामपंचायत सदस्य कार्तिक जनगाम, सुरज दुधीवार, रमेश चिंता, शब्बीर सय्यद, मनोहर अरिगेला, अमर उपारपू, देवेंद्र रंगु, सुरेश नागोडी, सतीश अरीगेला आदी गावकरी उपस्थित होते.
आरोग्य केंद्रात ३० ऑक्टाेबर ते नाेव्हेंबर २०१८ मध्ये जन्मलेल्या अंदाजे १४ बालकांची जन्म नोंद ग्रामपंचायत कार्यालय अंकिसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आली नाही.
त्यामुळे बालकांना आतापर्यंत जन्म दाखला न मिळाल्याने आई, वडिलांना मानसिक त्रास होत आहे. इतर सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. अंकिसाचे ग्रामविकास अधिकारी प्रकाश बंडावार यांना विचारणा केली असता, ग्रामपंचायत कार्यालयात गावात व आरोग्य केंद्रात बालके जन्मल्यानंतर २१ दिवसाच्या आत अहवाल सादर करावा लागतो असे सांगितले.