चामोर्शी नगर पंचायतीत काँग्रेसच्या सभापतींची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:29 AM2017-12-03T00:29:13+5:302017-12-03T00:29:40+5:30
चामोर्शी नगर पंचायतीच्या विषय व स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये सर्व सभापतीपदे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडे राहिली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी नगर पंचायतीच्या विषय व स्थायी समितीच्या सभापतींची निवडणूक प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडली. यामध्ये सर्व सभापतीपदे अपेक्षेप्रमाणे काँग्रेसकडे राहिली आहेत.
नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम यांची सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी अविरोध निवड करण्यात आली. तसेच पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी अविनाश चौधरी, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी विजय शातलवार, महिला व बाल कल्याण सभापतीपदी मंदाताई सरपे, उपसभापतीपदी सुनिता धोडरे यांची निवड अविरोध निवड करण्यात आली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्जच केला नाही. त्याचबरोबर आक्षेप किंवा हरकतही घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली.
पिटासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर व मुख्याधिकारी अर्शिया जुही यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित सभापती, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निशांत नैताम, नितीन वायलालवार, लोकेश शातलवार, मोनू मानापुरे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
कुरखेडा : शनिवारी पार पडलेल्या स्थानिक नगर पंचायतीच्या सभापती निवडणुकीत खांदेपालट करण्यात आले असून दोन नवीन सदस्यांकडे सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पाणी पुरवठा सभापती पदी पुंडलिक देशमुख, स्वच्छता व वैद्यक समिती पदावर मनोज सिडाम यांची वर्णी लावण्यात आली आहे. याकडे पहिल्यांदाच सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बांधकाम सभापती पदावर संतोष भट्टड यांची वर्णी लागली आहे. ते यापूर्वीही बांधकाम सभापतीच होते. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर यांच्याकडेही पूर्वीप्रमाणेच महिला व बालकल्याण सभापती पद कायम ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी सत्तापक्षाच्या चुकीमुळे विरोधी गटाचे रवींद्र गोटेफोडे हे पाणी पुरवठा सभापती म्हणून निवडून आले होते. यावेळी मात्र सत्तारूढ काँग्रेस व शिवसेना पक्षाने नियोजनबध्द आखणी केली. त्यामुळे सर्व सभापती पदावर सत्तारूढ गटाच्याच सदस्यांची वर्णी लागली आहे. निकालाची घोषणा झाल्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार बोहबंशी, पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, जि. प. सदस्य प्रभाकर तुलावी, प्रल्हाद कराडे, आशिष काळे, जयंत हरडे, अशोक इंदूरकर, निरांजनी चंदेल, संजय देशमुख, नवनाथ धाबेकर, नानक मनुजा, नगरसेवक उस्मान पठाण, आशा तुलावी, चित्रा गजभिये, अनिता बोरकर, विजय पुस्तोडे, उमाजी धुर्वे, खुशाल बन्सोड, जयेंद्र चंदेल, रामेश्वर लोहंबरे, नरेंद्र तिरणकर, गोलू धांडे, आशिष चुधरी, जयंत बुध्दे, राजीराम देशमुख यांनी जल्लोष साजरा केला.