कुरखेडात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:00 AM2020-01-31T06:00:00+5:302020-01-31T06:00:35+5:30

आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजना राबविली जाते. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल केली जात नसल्याने संस्थांचे गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया मागील १५ दिवसांपासून बंद ठेवली आहे.

Chakajam agitation of farmers in Kurkheda | कुरखेडात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

कुरखेडात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्दे१५ दिवसांपासून केंद्र बंद : धान खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी अनेक शेतकरी उतरले रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्र १५ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे धान विक्री ठप्प पडली आहे. धान खरेदी केंद्र सुरू करावे, या मुख्य मागणीसाठी कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात गोठणगाव नाक्यावर गुरूवारी (दि.३०) चक्काजाम आंदोलन केले.
आदिवासी विकास महामंडळामार्फत आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजना राबविली जाते. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची उचल केली जात नसल्याने संस्थांचे गोदाम फुल्ल झाले आहेत. त्यामुळे धान खरेदी प्रक्रिया मागील १५ दिवसांपासून बंद ठेवली आहे.
अजुनही ६० टक्के शेतकऱ्यांचे धान शिल्लक आहे. सहकारी संस्थांच्या काही मागण्या आदिवासी विकास महामंडळाकडे शिल्लक आहेत. शासन व संस्था यांच्यामध्ये तोडगा निघाला नाही. परिणामी धान खरेदी केंद्र बंद ठेवण्यात आले आहेत. धान खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी शेतकºयांनी चक्काजाम आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलनात तालुक्यातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जवळपास तीन तास वाहतूक रोखून धरण्यात आली. तहसीलदार सोमनाथ माळी, महामंडळांचे उपप्रादेशिक व्यवस्थापक एम. एस. बावणे, ठाणेदार सुधाकर देढे, एपीआय समीर केदार, सहकार अधिकारी सुनील अतकरे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मागण्या वरिष्ठांकडे पाठवून त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन तहसीलदार व इतर अधिकाºयांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व आमदार कृष्णा गजबे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक खेमनाथ डोंगरवार, भाजप जिल्हा उपाध्यक्ष गणपत सोनकुसरे, जिल्हा सचिव विलास गावंडे, सिनेट सदस्य चांगदेव फाये, नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, देसाईगंजचे न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, व्यंकटी नागिलवार, मुन्ना महाजन, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, डॉ. मनोहर आत्राम, यशवंत चौरीक, विनोद खुणे, उल्हास देशमुख, उद्धव गहाणे, सरपंच शिवाजी राऊत, काशिनाथ दोनाडकर, कुसन हिडको आदींनी केले.

Web Title: Chakajam agitation of farmers in Kurkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.