धान खरेदीसाठी शेतकऱ्यांचा चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:00 AM2020-12-23T05:00:00+5:302020-12-23T05:00:32+5:30
आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जातात. मागील वर्षी महामंडळामार्फत एकरी १६ क्विंटल धान खरेदी केले. मात्र यावर्षी केवळ ९ क्विंटल ६० किलाे धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिराेंचा तालुक्यात एकरी २० ते २५ क्विंटल धानाचे उत्पादन झाले आहे. महामंडळ केवळ ९.६० क्विंटल एवढेच धान खरेदी करणार आहे. उर्वरित विकायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला. धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करावी, या मागणीसाठी चक्काजमा आंदाेलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिराेंचा : आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करावी, या मागणीसाठी २१ डिसेंबर राेजी सकाळी ११ वाजतापासून नारायणपूर मार्गावर चक्काजाम आंदाेलन करण्यात आले.
या आंदाेलनात महिला शेतकऱ्यांनीही सहभाग घेतला हाेता. आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत धान खरेदी केंद्र चालविले जातात. मागील वर्षी महामंडळामार्फत एकरी १६ क्विंटल धान खरेदी केले. मात्र यावर्षी केवळ ९ क्विंटल ६० किलाे धान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिराेंचा तालुक्यात एकरी २० ते २५ क्विंटल धानाचे उत्पादन झाले आहे. महामंडळ केवळ ९.६० क्विंटल एवढेच धान खरेदी करणार आहे. उर्वरित विकायचे कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला. धान खरेदीची मर्यादा एकरी २० क्विंटल करावी, या मागणीसाठी चक्काजमा आंदाेलन करण्यात आले. तहसीलदारांचे प्रतिनिधी मंडळ अधिकारी एम.आर.बांडे व तलाठी रवींद्र शेरकी यांनी आंदाेलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. आंदाेलनातील शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार एच.व्ही.सय्यद यांच्याशी माेबाईलवर संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांनी दिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, रवी सल्लमवार, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, राकाॅं तालुकाध्यक्ष मधुकर काेल्लुरी, सतीश भाेगे यांनी आंदाेलनस्थळाला भेट देऊन पाठिंबा दर्शविला. जवळपास दीड तास आंदाेलन चालल्याने मार्गाच्या दाेन्ही बाजूला वाहनांची माेठी रांग लागली हाेती. आंदाेलनाचे नेतृत्व व्यंकय्या भीमकरी, अशाेक इंगिली, पांते मलय्या, रापेली आनंदराव, गट्टू चमकरी, मधुकर इंगिली, ताेंबरअला दुर्गय्या, दात्र स्वामी, राजेंद्र नसकुरी, नागराजू इंगिला, येलख्खा लिंगय्या, स्वामी नुसेटी, ताला व्यंकल्ला, राजू कुडेकरी यांनी केले.
आंदाेलनात नारायणपूर, मेडाराम, कारसपल्ली, अमरादी, रंगय्यापल्ली, कुरखेडा, टेकडा या गावांमधील तसेच परिसरातील शेकडाे शेतकरी सहभागी झाले आहेत.