चामोर्शीत शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:21 PM2018-08-27T22:21:57+5:302018-08-27T22:22:19+5:30
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत समितीसमोर सोमवारी धरणे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन संवर्ग विकास अधिकारी यांना सादर केले.
शिक्षकांना प्रत्येक महिन्याला वेतन द्यावे, जून महिन्याचे प्रलंबित वेतन अदा करावे, जुलै महिन्याचे वेतन तत्काळ द्यावे, कोणतेही स्पष्टीकर न देता कपात करण्यात आलेले एक दिवसाचे वेतन तत्काळ द्यावे, प्राथमिक शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल मंजूर करून देयके अदा करावी, रजा मंजूर करून वेतन द्यावे, कॅन्सरग्रस्त शिक्षकांचे वेतन नियमित काढावे, सहाव्या वेतन आयोगाची जीपीएफला न पाठविलेला चवथा व पाचवा हप्ता तत्काळ द्यावा, बदली झालेल्या शिक्षकांची एलपीसी द्यावी, शालेय पोषण आहार योजनेचा तांदूळ व इतर व साहित्य नियमितपणे पुरवठा करावे, इंधन व भाजीपाला देयके द्यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष नरेंद्र कोत्तावार, अध्यक्ष राजेश बाळराजे, सरचिटणीस संजय लोणारे, कार्याध्यक्ष हरेंद्रनाथ सिकदार, कोषाध्यक्ष ओमप्रकाश साखरे, येंबडवार, अतुल बाला, राजेंद्र वडेट्टीवार, साई गोडसेलवार, अनिल मारतीवार, वासुदेव कुनघाडकर, अनिल बारई, सुरेश नाईक, मारटकर, पुरूषोत्तम पिपरे, टी.टी.सरकार, मोहन चहारे, मोहन पडिशाला, डब्ल्यू.व्ही.शेडमाके, रामगिरवार, सहसचिव नितीन जाधव, जे.बी.गेडाम, देवाजी तिम्मा, महेंद्र वासेकर, नरेश जाम्पलवार, श्रीरंग खेवले, रमेश किरकिरे, विलास बोलगोडवार, राजेश कुंदावार, ओम बामनवार यांनी केले.