चामोर्शी -हरणघाट रस्ता गेला पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:42 AM2021-08-20T04:42:55+5:302021-08-20T04:42:55+5:30
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर आहेतच पण बारीक गिट्टी, चुरी , डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली आहे. रात्री ...
या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तर आहेतच पण बारीक गिट्टी, चुरी , डागडुजीच्या वेळेस टाकलेली माती रस्त्यावर निघालेली आहे. रात्री वाहनधारकांना धुळीमुळे वाहन चालवायला मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता बळावली आहे. आता सुरू असलेल्या पावसाने संपूर्ण रस्ता पाण्यात गेला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी काही ठिकाणी डांबर टाकले होते. पण, पहिल्या पावसात ते डांबर उखडून त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. अनेक वर्षापासून या परिसरातील नागरिकांची मागणी आहे की, हा रस्ता पक्का व्हावा. पण ही मागणी अजून पर्यंत रखडलेली आहे. मागील वर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे पडले असता काही प्रमाणात या रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. तेव्हापासून आता पर्यंत जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. आता सुरू असलेल्या पावसाने रस्त्याची दाणादाण उडाली आहे. या परिसरातील जवळपास सर्वच रस्ते खराब झाल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणच्या रस्त्यावर बारीक डांबर उखडून खडी रस्त्यात पसरली आहे. वाहने घसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
190821\img_20210819_145018.jpg
चामोर्शी हरणघाट रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेले आहे.