चामोर्शीची नूतन शाळा झाली डिजिटल

By admin | Published: September 26, 2016 01:38 AM2016-09-26T01:38:48+5:302016-09-26T01:38:48+5:30

चामोर्शी केंद्रांतर्गत येणारी व शहरातील जि. प. प्राथमिक नूतन शाळेने चामोर्शी शहरातून व केंद्रातून डिजिटल होण्याचा प्रथम मान पटकाविला आहे.

Chamorshi School opens digital | चामोर्शीची नूतन शाळा झाली डिजिटल

चामोर्शीची नूतन शाळा झाली डिजिटल

Next

शहरातील पहिली शाळा : जि. प. सभापतींच्या हस्ते उद्घाटन
चामोर्शी : चामोर्शी केंद्रांतर्गत येणारी व शहरातील जि. प. प्राथमिक नूतन शाळेने चामोर्शी शहरातून व केंद्रातून डिजिटल होण्याचा प्रथम मान पटकाविला आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त नियोजन सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते शनिवारी डिजिटल शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. सभापती शशिबाई चिळंगे होत्या. यावेळी न. पं. उपाध्यक्ष राहूल नैताम, नगरसेविका रोशनी वरघंटे, मीनल पालारपवार, कविता किरमे, प्रज्ञा उराडे, शिक्षण विस्तार अधिकारी दीपक देवतळे, केंद्रप्रमुख शील, शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य वाय. आर. मेश्राम, माजी पं. स. उपसभापती बंडू चिळंगे, माजी मुख्याध्यापक देवाजी बुरांडे, मदन नैताम, मुख्याध्यापक राजेश बाळराजे, शिक्षक रघुनाथ भांडेकर, उषा नवघरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास दुधबळे, उपाध्यक्ष सुुनीता साखरे, सदस्य मिलींद भांडेकर, साईनाथ गव्हारे, लोमेश बुरांडे, ममता मानकर व केंद्रातील शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मुख्याध्यापिका लता नगराळे, संचालन साईनाथ सोनटक्के तर आभार नरेश गेडाम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)

कोडीगाव शाळा होणार डिजिटल
मुलचेरा- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी ज्ञानरचनावाद पद्धतीने अध्यापनावर भर दिला जात असल्याने सुंदरनगर केंद्रातील जि. प. शाळा कोडीगाव डिजिटल होण्याच्या मार्गावर आहे. मुलचेरा तालुक्यातील आंबटपल्ली ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या कोडीगाव जि. प. शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. या वर्गांमध्ये एकूण २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत २०१३ पासून बी. एन. कुद्रपवार, सी. बी. कुद्रपवार हे शिक्षक दाम्पत्य शिकविण्याचे काम करतात. शाळा समितीचे अध्यक्ष दामोधर पेंदाम, उपाध्यक्ष अल्का मडावी, सरपंच लजय्या पेंदाम, पोलीस पाटील मंगरू आलाम यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने शाळा डिजिटल करण्याचा निर्णय घेतला व काम सुरू झाले. ३९० लोकसंख्या असलेल्या गावकऱ्यांनी ४० हजार रूपये या कामासाठी जमा केलेत. जून महिन्यात बचत बँकेचे उद्घाटन करून पाच हजार १०० रूपये जमा करण्यात आले.

Web Title: Chamorshi School opens digital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.