चामोर्शी तलाठी कार्यालयाने केला तीन लाख २ हजार ५९८ रुपयांचा महसूल गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:35 AM2021-05-17T04:35:15+5:302021-05-17T04:35:15+5:30
या कार्यालयांतर्गत सातबारा, नमुना ८, नकाशा, जमीन खरेदी फेरफार, गावातील घडलेल्या घटनेचे पंचनामे, वाद-विवाद, चौकशी व शेती विषयक कामे ...
या कार्यालयांतर्गत सातबारा, नमुना ८, नकाशा, जमीन खरेदी फेरफार, गावातील घडलेल्या घटनेचे पंचनामे, वाद-विवाद, चौकशी व शेती विषयक कामे तलाठी कार्यालयांतर्गत केली जात असतात. या कार्यालयांतर्गत कृषक जमीन महसूल, अकृषक जमीन महसूल, रोजगार हमी उपकर, वाढीव जमीन महसूल, संकीर्ण महसूल वसुली या शेतसाऱ्याची एकूण मागणी ५ लाख ७३ हजार ६२४ होती. त्यापैकी ३ लाख २ हजार ५९८ रुपयांची महसूल वसुली गोळा करण्यात आली. कृषक जमीन महसूल मागणी प्रत्येकी ११०११ रुपये आहे. अकृषक जमीन महसूल मागणी ५ लाख ५१ हजार ७७५ रुपये मागणी तर वसुली २ लाख ८० हजार ७४९ रुपये, रोज रोजगार हमी उपकर मागणी १० हजार ७३३ तर वसुली १० हजार ७३३ रुपये, वाढीव जमीन महसूल मागणी १०५ तर वसुली १०५ रुपये, ३ लाख २ हजार ५९८ रुपयांची महसुली वसुली करण्यात आली तर पंतप्रधान किसान सन्मान याेजनेचे २ लाख ७२ हजार रुपये वसुली आल्याची माहिती तलाठी नरेंद्र मेश्राम यांनी दिली.
===Photopath===
160521\img_20210515_094754.jpg
===Caption===
तलाठी कार्यालय चामोर्शी फोटो