चामोर्शीत महिला दारूबंदी समिती गठित
By admin | Published: October 5, 2016 02:26 AM2016-10-05T02:26:15+5:302016-10-05T02:26:15+5:30
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार ३ आॅक्टोबर रोजी नगर पंचायतच्या भवनात प्रतिष्ठीत नागरिक
चामोर्शी : पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार ३ आॅक्टोबर रोजी नगर पंचायतच्या भवनात प्रतिष्ठीत नागरिक व महिला यांच्या उपस्थितीत ११ सदस्यीय महिला दारूबंदी समिती गठित करण्यात आली.
समितीच्या अध्यक्षपदी सुलभा लटारे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून जीजाबाई वासेकर, सचिव सुजाता उंदीरवाडे व इतर सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहायक फौजदार शशिकर चिचघरे, पोलीस हवालदार धर्मा, तोरे, नगरसेविका मीनल पालारपवार, कविता किरमे, मंदा सरपे, माधवी विनोद पेशट्टीवार, अमोल आर्इंचवार, पोलीस पाटील सुरेश कोटांगले, अवधूत चलाख, भाजपा चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, जयनगरच्या सरपंच प्रतिभा सरकार, कविता किरमे, नगरसेविका रोशनी वरघंटे, प्रशांत येगलोपवार आदी उपस्थित होते.
चामोर्शी शहरात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. समितीचे सर्व सदस्य चामोर्शी शहरातील दारूविक्रीची पाळेमुळे खोदून काढतील, असा संकल्प नवनियुक्त समितीच्या सदस्यांनी केला. दारू पकडल्यानंतर याची माहिती पोलिसांना द्यावी. पोलीस तत्काळ पोहोचतील, असे आश्वासन पीएसआय थोरात यांनी दिले. (शहर प्रतिनिधी)