कृतीने परिवर्तन ही कार्यकर्त्यांची शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 01:32 AM2017-10-15T01:32:43+5:302017-10-15T01:32:52+5:30

स्वत:च्या बळावर आपल्या क्षेत्रात कृती करून परिवर्तन करणे ही सामाजिक कार्यकर्त्यांची शक्ती आहे, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना दिला.

Change of action is the power of the workers | कृतीने परिवर्तन ही कार्यकर्त्यांची शक्ती

कृतीने परिवर्तन ही कार्यकर्त्यांची शक्ती

Next
ठळक मुद्देव्यसनमुक्तीवर सभा : अभय बंग यांचा विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्वत:च्या बळावर आपल्या क्षेत्रात कृती करून परिवर्तन करणे ही सामाजिक कार्यकर्त्यांची शक्ती आहे, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना दिला.
दारू व तंबाखूमुक्तीसाठी मुक्तिपथ अंतर्गत स्वयंसेवी संस्थांनी सहकार्यातून काम करावे, या हेतूने शनिवारी मुक्तिपथच्या गडचिरोली येथील जिल्हा कार्यालयात सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विकास संस्थेचे मनोहर हेपट, सर्वोदय मंडळाचे डॉ. मुरलीधर बद्दलवार, सत्यसाई सेवा संघटनेचे दुधराम समर्थ, भगवान गेडाम, उद्धव डांगे, सुधा सेता, श्याम किनेकार, समर्थ आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. बंग यांनी दारू व तंबाखूमुक्तीबाबत संभाव्य कृतीची आखणी केली. सामाजिक संस्थांच्या सामूहिक अहिंसक सामाजिक कृतीवर या सभेत विशेष चर्चा करण्यात आली. मागील एका वर्षात मुक्तिपथ अभियानाअंतर्गत काय काम झाले, याबाबतची मांडणी या सभेत करण्यात आली. याप्रसंगी मुक्तिपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांनी मुक्तिपथ बाबत माहिती दिली. संचालन संतोष सावलकर यांनी केले.

Read in English

Web Title: Change of action is the power of the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.