पेसा ते नॉनपेसा बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 11:41 PM2017-10-20T23:41:01+5:302017-10-20T23:41:12+5:30

जिल्ह्याच्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील गावांची विभागणी पेसा कायद्यांतर्गत पेसा व नॉनपेसा गावे अशी करण्यात आली आहेत. यापूर्वी जि. प. शिक्षकांच्या बदल्या नॉन पेसा ते पेसा अशा करण्यात येत होत्या.

 Change Pesa to NonPass | पेसा ते नॉनपेसा बदली करा

पेसा ते नॉनपेसा बदली करा

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : जि. प. शिक्षकांच्या पत्नींचे सीईओ व उपाध्यक्षांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील गावांची विभागणी पेसा कायद्यांतर्गत पेसा व नॉनपेसा गावे अशी करण्यात आली आहेत. यापूर्वी जि. प. शिक्षकांच्या बदल्या नॉन पेसा ते पेसा अशा करण्यात येत होत्या. तेव्हा शिक्षक आदेशाचे पालन करीत दुर्गम भागात सेवा देत होते. परंतु अनेक तालुक्यातील गावे पेसा कायद्यात मोडत असूनसुद्धा हेतू पुरस्सर या गावांना बदली प्रक्रियेतील अवघड क्षेत्राच्या गावांच्या यादीतून वगळण्यात आले. जिल्ह्यातील ज्या शिक्षकांनी दुर्गम भागात पेसा गावात सेवा दिली व सध्या देत आहेत. अशा शिक्षकांवर या बदली प्रक्रियेमुळे दुर्गम भागातच राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय होत आहे. शिक्षकांची बदली प्रक्रिया पेसा कायद्यानुसार पेसा ते नॉन पेसा करावी, अशी मागणी शिक्षकांच्या पत्नींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. पेसा कायद्यानुसार दुर्गम गावांना अवघड क्षेत्राच्या यादीत समाविष्ट करण्यात आले. विशेष बाब म्हणून जिल्ह्यात बदली प्रक्रिया पेसा कायद्यानुसार पेसा ते नॉन पेसा अशी पार पाडून जे शिक्षक पेसा गावात कार्यरत आहेत. त्यांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक संबोधून बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली. पेसा क्षेत्रात मोडणाºया गावांना अवघड क्षेत्राच्या यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागात सेवा देणाºया शिक्षकांना अन्याय होणार आहे. यापूर्वीही दुर्गम भागात राहून शिक्षक सेवा देत होते. सध्या काही शिक्षक अजुनही सेवा देत आहेत. बºयाच कालावधीनंतर कुटुंब विशिष्ट ठिकाणी स्थायी झाले आहे. परंतु बदली प्रक्रियेमुळे कुटुंबापासून वेगळे राहण्याची वेळ आली आहे. परिणामी कुटुंबावर अन्याय होणार आहे. ज्याप्रमाणे पती-पत्नींना एकत्रीकरणाचा लाभ दिला जातो. त्याच धर्तीवर आम्हालाही एकत्रीकरणाचा लाभ देण्यात यावा, ज्या ठिकाणी निवासस्थान आहे व कुटुंब वास्तव्य करीत आहे त्यापासून ३० किमीपर्यंत शिक्षकांना बदलीचा लाभ द्यावा व नोकरीच्या इतर सेवेमध्ये देखील एकत्रीकरणाचा विचार करण्यात यावा अन्यथा आंदोलन उभारू, असा इशारा शिक्षकांच्या पत्नींनी दिला आहे. निवेदन देताना सुषमा दिवटे, कविता कुथे, शकिला सहारे, अस्मिता गायकवाड, रिजवाना खान, अश्विनी उईके, भारती दुधकुंवर, संगीता नंदेश्वर, इंदू पत्रे, रेखा पिल्लारे, संध्या बागडे, ललीता कोटगले, शालू मेश्राम, वर्षा कुथे, के. एम. साखरे, आर. के. चिमणकर, सिद्धार्थ दिवटे, राजेंद्र सहारे, नोहीद खान उपस्थित होते.

Web Title:  Change Pesa to NonPass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.