फेरफारमध्ये तांत्रिक अडचणी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:26 AM2020-12-27T04:26:47+5:302020-12-27T04:26:47+5:30
गडचिराेली : अनेक शेतकरी ऑनलाईन फेरफार करण्यासाठी महसूल विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिझवत आहेत. मात्र ऑनलाईन फेरच्या कामात तांत्रिक अडचणी ...
गडचिराेली : अनेक शेतकरी ऑनलाईन फेरफार करण्यासाठी महसूल विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिझवत आहेत. मात्र ऑनलाईन फेरच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण हाेत आहेत. फेरफारची कामे डिजिटल झाल्याने तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या स्वतंत्र आयडीवरून कामे हाेत आहेत.
पुलावर कठडे नाही
अहेरी : तालुक्यातील रायगट्टानजीक पुलावर कठडे नसल्याने येथे अपघाताची शक्यता बळावली आहे. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पावसाळ्यात नेहमीच पाणी असते. परिणामी अनेकदा वाहतूक ठप्प होते. त्यामुळे पुलावर कठडे लावावे, अशी मागणी नागरिकांची आहे.
तलाव सौंदर्यीकरण करा
चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही, त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे हाेत आहे.
शहरातील रस्त्यावर बांधकाम साहित्य
गडचिरोली : घराचे बांधकाम सुरू असून बांधकाम साहित्य रस्त्यावर ठेवत आहेत. लोखंडी सळाख तोडण्याचे कामही रस्त्यावरच करण्यात येते. रस्त्यावरच विटा, रेती, गिट्टी, सळाख ठेवली जाते.
सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून याकडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात व दुकानातील कचराही टाकतात.
मालेवाडा परिसर समस्यांच्या गर्तेत
कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. आरोग्य सेवा सुधारण्याची तसेच वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी
गडचिरोली : गडचिरोली शहरातील पटेल सायकल स्टोअर्स ते आठवडी बाजार या मार्गावर चारचाकी वाहनांना तसेच जड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी व्यावसायिक व नागरिकांनी केली आहे. नगर परिषदेने काही वर्षापूर्वी कठडे लावून बंदी घातली होती. मात्र त्याची अंमलबजावणी हाेत नाही.