चापलवाडा - मछली नाल्यावर निकृष्ट दर्जाचा बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:28 AM2021-04-29T04:28:46+5:302021-04-29T04:28:46+5:30
या कामामध्ये बंधाऱ्यासाठी वापरण्यात आलेला सिमेंट व रेती अयोग्य असल्याचे दिसून आले. बांधकामाकरीता रेती ही नाल्यातीलच मातीयुक्त वापरत असल्याचे ...
या कामामध्ये बंधाऱ्यासाठी वापरण्यात आलेला सिमेंट व रेती अयोग्य असल्याचे दिसून आले. बांधकामाकरीता रेती ही नाल्यातीलच मातीयुक्त वापरत असल्याचे दिसून आले. बंधारा बनवण्यापूर्वी खोलीकरण करून बेड काँकेट केल्या जाते परंतु सदर कंत्राटदाराने बेड काँक्रीट न टाकता सरळ कामाला सुरुवात केली तसेच पाणी साठवण्यासाठी नाल्याचे खोलीकरण करणे आवश्यक आहे परंतु ते पूर्णपणे खोलीकरण नसल्याचे आढळून आले.
सदर बंधाऱ्यामुळे चापलवाडा व मछली येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार असून पाण्याची पातळी वाढ होणार आहे. नागरिकांनी बंधाऱ्याला भेट देऊन बंधाऱ्याचे काम बंद करून या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बंधारा कामाच्या पाहणी दरम्यान गितेश कोहपरे, सुधाकर मेकलवार, प्रभाकर माधवराव, गोपीनाथ बाकवार, संदीप सातपुते, प्रवीण चौधरी, मिलिंद घोगरे,वामन तणटकवार, दिवाकर भट्टलवार, नामदेव वैरागडे, पुरुषोत्तम गांधरवार, भास्कर तनटकवार, सुधाकर गरतुलवार, नीलकंठ वैरागडे,अक्षय घोगरे, मनोज मंडल, दिनेश किरमे आदी उपस्थित होते. सदर कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
चापलवाडा व मछली येथील नागरिकांनी बंधारा बाधकांमासदर्भात आमदार डाॅ. देवराव होळी यांना माहीती दिली असता सदर बांधकामाची तात्काळ चौकशी करावी व स्थानिक नागरिकांना विश्वास घेवून बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे.