सिराेंचाच्या शाळेचा प्रभार चिमूरच्या मुख्याध्यापिकेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:47 AM2021-02-25T04:47:41+5:302021-02-25T04:47:41+5:30
सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथे समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती (नवबौद्ध) मुलींची निवासी शाळा ही सन २०१३ पासून चालविली जात आहे. ...
सिरोंचा जिल्हा गडचिरोली येथे समाजकल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती (नवबौद्ध) मुलींची निवासी शाळा ही सन २०१३ पासून चालविली जात आहे. या शाळेत १९ पदे मंजूर असून, फक्त चार पदे भरलेली आहे. त्यातच मुलींची शाळा असून ही येथे कायमस्वरूपी एकही महिला कर्मचारी नाही. तात्पुरत्या स्वरूपात विभागाने येथे महिला मुख्याध्यापिकेची प्रतिनियुक्ती केली आहे. परंतु महिला मुख्याध्यापिकेकडे सिरोंचा आणि चिमूर या दोन्ही शाळेच्या कार्यभार सोपविण्यात आला आहे.
सिरोंचा येथे महिला मुख्याध्यापिकेची गरज असतानाही चिमूर येथील अतिरिक्त पदभार देण्याचा अजब गजब कारभार प्रादेशिक उपायुक्त नागपूर यांनी केला आहे. शाळा मुलींची निवासी असल्यामुळे कायमस्वरूपी मुख्याध्यापिका, अधीक्षिका आणि दोन ते तीन महिला शिक्षिका शाळेला द्याव्यात कोणाकडेही चार्ज देऊन ही पदे भरली जाऊ नये अशी सिरोंचा येथील पालकांची मागणी आहे महिला कर्मचाऱ्यांचा मागणीसाठी वारंवार आयुक्त, प्रादेशिक उपायुक्त, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांना निवेदने देऊनही या शाळेच्या समस्यांकडे विभागाकडून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. मागणी पूर्ण न झाल्यास शाळा बंद आंदोलन करून मानवाधिकार आयोगात तक्रार दाखल करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.