मुरूम तस्करी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:40 AM2021-05-20T04:40:07+5:302021-05-20T04:40:07+5:30

मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत कर्मचाऱ्यांसह तपासणीसाठी गेले असता नागेपल्ली येथील रहिवासी गिल्लास मरिया ...

Charges filed against pimple smugglers | मुरूम तस्करी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा दाखल

मुरूम तस्करी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा दाखल

Next

मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेदरम्यान अवैध गौण खनिज वाहतुकीबाबत कर्मचाऱ्यांसह तपासणीसाठी गेले असता नागेपल्ली येथील रहिवासी गिल्लास मरिया रत्नम यांच्या घरासमोर एम.एच. ३३ टी. ११४६ या क्रमांकाचे ट्रॅक्टर मुरूम टाकत असताना आढळून आले.

सदर ट्रॅक्टरबाबत वाहनचालकास विचारणा करीत असताना काही अंतरावर संतोष अग्रवाल हा संशयास्पद स्थितीत आढळून आला. ट्रॅक्टरबाबत इतर कोणत्या तरी व्यक्तीस मोबाइलद्वारे माहिती देताना दिसून आल्याने त्याला थांबवून विचारणा केली. दरम्यान, बुरक मलमपल्ली सर्वे नंबर १६ मधून मुरूम काढण्यात येत होता. त्याठिकाणी अंदाजे नऊ ट्रॅक्टर व जेसीबी मशीन होत्या; परंतु शासकीय ताफा येत असल्याचे कळताच ट्रॅक्टरचालकाने पळ काढला. त्याचा पाठलाग केला असता फक्त दोन ट्रॅक्टर पकडण्यात यश आले, तसेच एका ट्रॅक्टरचालकाकडून पासही अवगत करण्यात आला.

याची तपासणी केली असता गिल्लास रत्नम व ट्रॅक्टर चालकाकडून मिळालेला पास एकाच शाईने लिहिला असल्याचे कळले. मॅजिक पेनचा वापर करून एकाच पासचा वापर वारंवार करून शासनाचा महसूल बुडविणे, अवैध वाहतूक करणे आणि फसवेगिरी करणे या आरोपाखाली प्रभाकर डोंगरे व संतोष अग्रवालविरोधात तक्रार दाखल करण्यात आली.

पुढील तपास अहेरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय आसावरी शेडगे करीत आहेत.

(बॉक्स)

मॅजिक पेनचा वापर

याबाबत सविस्तर चौकशी करताना सदर वाहन चालकाकडे प्रभाकर लक्ष्‍मण डोंगरे यांच्या नावे कार्यालयामार्फत निर्गमित केलेला वाहतूक पास आढळून आला. सदर पासवरील अक्षरे मॅजिक पेनद्वारे लिहिलेली असल्याचा संशय आल्याने लगेच सदर पास दुचाकीच्या गरम सायलेन्सरवर ठेवला असता त्यावरील मुद्रांक क्रमांक सहापुढील अक्षरे आपोआप नाहीशी झाली.

Web Title: Charges filed against pimple smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.