चामोर्शी व घोटला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:29 AM2018-05-17T00:29:55+5:302018-05-17T00:29:55+5:30

चामोर्शी, एटापल्ली तालुक्यासह घोट परिसर व जिल्ह्याच्या अनेक भागात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी पाऊस बरसला. वादळामुळे एटापल्ली-चामोर्शी तालुक्यात अनेक घरांचे छत कोसळले. तसेच झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला.

Charmoshi and Thore Storm Storm | चामोर्शी व घोटला वादळाचा तडाखा

चामोर्शी व घोटला वादळाचा तडाखा

googlenewsNext
ठळक मुद्देघराची टिनपत्रे उडाली, झाडे कोसळली : घोट परिसरातील वीज पुरवठा खंडित, एटापल्लीतही पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/एटापल्ली/घोट : चामोर्शी, एटापल्ली तालुक्यासह घोट परिसर व जिल्ह्याच्या अनेक भागात सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी पाऊस बरसला. वादळामुळे एटापल्ली-चामोर्शी तालुक्यात अनेक घरांचे छत कोसळले. तसेच झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. घोट परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.
चामोर्शी शहरात सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसला. वादळामुळे तेलंग मोहल्ला वार्ड नंबर २ मधील अशोक कस्तुरे यांच्या बाथरूमचे टिनपत्रे उडाली. वादळामुळे दिना विश्राम गृहानजीक क्वॉटर नजीकच्या झाडाच्या फांद्या क्वॉटरवर कोसळल्या. यामुळे क्वॉटरसमोरील सिमेंट पत्रे तुटून पडले. यामुळे एस.एम. गेडाम यांच्या घरातील साहित्यांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. नुकसानीमुळे गेडाम यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. वरिष्ठांनी दखल घेऊन क्वॉटरची दुरूस्ती करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. घोट परिसरातील निकतवाडा, नवेगाव, कर्दुळ, दर्पणगुड्डा, वरूळ, गांधीनगर, चापलवाडा, कोतेपल्ली येथील घरांचे नुकसान झाले. निकतवाडा येथील घरांचे छत वादळाने उडाले. घोट रेगडी मार्गावर झाडे कोसळली. आंब्याचेही मोठे नुकसान झाले. एटापल्ली व मुलचेरा तालुक्यासही वादळी पावसाचा फटका बसला.

Web Title: Charmoshi and Thore Storm Storm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस