निराधार महिलांना धनादेशाचे वाटप
By admin | Published: October 17, 2016 02:10 AM2016-10-17T02:10:14+5:302016-10-17T02:10:14+5:30
महसूल विभागाच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भेंडाळा येथे शुक्रवारी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेण्यात आले.
भेंडाळात समाधान शिबिर : १२ लाभार्थ्यांना मदत
चामोर्शी : महसूल विभागाच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भेंडाळा येथे शुक्रवारी महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेण्यात आले. या समाधान शिबिरादरम्यान राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांच्या धनादेशाचे वितरण आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, तहसीलदार ए. डी. येरचे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुभाषग्राम येथील लतीका हरिपद मंडल, गौरी गुरूपद मंडल, विठ्ठलपूर येथील मंदा भगवान चिताडे, राममोहनपूर येथील निलिमा रिदम मंडल, कर्दुळटोला येथील पंचफुला कैलास लोहबळे, ताराबाई गणेश नैताम, कौतुकाबाई लहुदास दुर्गे रा. मुधोली, हरिचंद्र रूषी सोनटक्के रा. मुरखळा, गयाबाई देवाजी शेंडे रा. फोकुर्डी, वर्षा दिलीप कोवे रा. कढोली, शेवंता नीलकंठ मोहुर्ले रा. कर्दुळटोला, आरती सुधाकर दास रा. सुभाषग्राम या १२ लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)