१२ लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 12:54 AM2018-04-12T00:54:29+5:302018-04-12T00:54:29+5:30
राष्ट्रीय कुुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यातील १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : राष्ट्रीय कुुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यातील १२ लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला २० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. या अंतर्गत मार्च २०१८ मध्ये मंजूर झालेल्या १२ लाभार्थ्यांना कार्यालयाकडून लाभ देण्यात आला. यापैकी तीन लाभार्थ्यांना रेगडी येथील जनजागरण मेळाव्यात तर नऊ लाभार्थ्यांना चामोर्शी तहसील कार्यालयात धनादेश वितरित करण्यात आले. यामध्ये हळदी चक येथील अमृता महादेव भोयर, लखमापूर येथील सविता खोमेश्वर मेश्राम, सगणापूर येथील पुष्पा संजय कुमरे, वाघोली येथील सविता विजय वासेकर, सुभाषग्राम येथील गीता मनोज बिश्वास, जामगिरी येथील नीलिमा रमेश गावडे, घोट येथील मायाबाई काशिनाथ कुमरे, गौरीपूर येथील शोभा सुखरंजन घरामी, कुनघाडा रै. येथील बेबी हरिदास किरमे, राजगोपालपूर येथील सिंधूबाई हिरामण कावळे, रेगडी येथील देवाजी केये वड्डे, कर्दुळटोला येथील बंडू तुलाराम गुरनुले यांचा समावेश आहे.
तहसीलदार अरूण येरचे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी नायब तहसीलदार एस. के. बावणे उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ग्रामीण पातळीवर महसूल यंत्रणेमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांनी संबंधित तलाठ्याकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन तहसीलदार येरचे यांनी केले.