कुरुडात छत्रपती शिवाजी महाराज जयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:37 AM2021-02-24T04:37:52+5:302021-02-24T04:37:52+5:30
समृद्धी फाऊंडेशन, कुरुड या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारला गावातील शाळा व महाविद्यालयांमध्ये, महापुरुषांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञान ...
समृद्धी फाऊंडेशन, कुरुड या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारला गावातील शाळा व महाविद्यालयांमध्ये, महापुरुषांच्या जीवनावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा मोफत आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये गावातील सर्वच वयोगटातून जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल घोषित करीत वयोगटानुसार सन्मानपत्र, ट्रॉफी देऊन बक्षीस वितरण करण्यात आले. नंतर रात्री ८ वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात शिवचरित्र आणि त्याकाळातील शासन पद्धती या विषयांवर, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त युवा समाजसेवक उदयकुमार पगाडे यांच्या प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी माजी जि. प.सदस्य सुरेंद्रसिंग चंदेल, सरपंच प्रशाला गेडाम, उपसरपंच क्षितीज ऊके, सदस्य विलास पिलारे, शंकर पारधी, अविनाश गेडाम तसेच समृद्धी फाऊंडेशनचे चक्रधर आठवले, प्रदीप वरंभे, संदीप नाहाले, रमेश ढोरे, आशिष नाहाले, अखिल मिसार, प्रफुल्ल आठवले, पकंज मिसार आणि गावातील नागरिक उपस्थित होते.