अतिदुर्गम भागातल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये रमले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2022 07:15 AM2022-03-06T07:15:00+5:302022-03-06T07:15:02+5:30

Gadchiroli News गडचिरोलीतल्या अतिदुर्गम भागात असलेल्या मयालघाट या गावात शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद (आयएएस) यांनी आकस्मिक भेट दिली.

Chief Executive Officer of ZP played with students in remote areas | अतिदुर्गम भागातल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये रमले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी 

अतिदुर्गम भागातल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये रमले जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी 

Next
ठळक मुद्देअतिदुर्गम मयालघाटला भेट गावातील विकासकामांचीही पाहणी

लिकेश अंबादे

गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून २६ किलोमीटर अंतरावर असलेल्या अतिदुर्गम, संवेदनशील तसेच मूलभूत सुविधांपासून वंचित अशा मयालघाट या गावात शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद (आयएएस) यांनी आकस्मिक भेट दिली. यावेळी ‘फुलोरा’ उपक्रमांतर्गत शाळेतील सुविधा, विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता विकास आदींची तपासणी करताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

रस्ते, आरोग्य, पाणी, विजेच्या समस्येमुळे नेहमीच अडचणींचा सामना करीत असलेले मयालघाट हे गाव गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. ‘फुलोरा मूलभूत क्षमता विकसन कार्यक्रमांतर्गत फुलोरा शाळा, अंगणवाडी तसेच गावातील विकासकामांची आशीर्वाद यांनी पाहणी केली. तसेच शाळेची मूलभूत समस्या असलेली वर्गखोलीची दुरुस्ती व नवीन इमारत बांधकाम मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी सतीश टिचकुले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद म्हशाखेत्री हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली पायाभूत क्षमता व गुणवत्ता विकास कार्यक्रम जिल्ह्यातील निवडक शाळांमध्ये सुरू आहे. सदर उपक्रम मयालघाट शाळेत गटशिक्षणाधिकारी यशवंत टेंभुर्णे, कोरची केंद्राचे केंद्र प्रमुख हिराजी रामटेके, फुलोरा सुलभक दिलीप नाकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे शिक्षकवृंद जितेंद्र साहाळा व प्रतिभा भेंडारकर राबवत आहेत. फुलोरा उपक्रमातील कृतींच्या सहाय्याने विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. सीईओ आशीर्वाद यांनी स्वतः प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांत रमून विद्यार्थ्यांच्या स्तरांची तपासणी करून त्यांच्या गुणवत्तेबद्दल समाधान व्यक्त केले.

या भेटीदरम्यान अंगणवाडी पर्यवेक्षिका चिमूरकर, मुरकुटीच्या सरपंच सुमित्रा कोरचा, उपसरपंच राजाराम वट्टी, ग्रामसेवक शेडमाके, फुलोरा सुलभक दिलीप नाकाडे, आशा वर्कर इंदारो कोरचा, धमगाये तसेच इतर विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

या कामांची केली तपासणी

फुलोरा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये होत असलेले बदल पाहण्याच्या दृष्टीने सीईओ यांची ही आकस्मिक भेट होती. त्यानंतर अंगणवाडी केंद्र मयालघाट येथे भेट देऊन सकस आहार, बालकांचे आरोग्य तथा विविध उपक्रमांबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. सोबतच पंचायत विभागामार्फत गावात राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तथा विकासकामांची पाहणी केली. यामध्ये विशेषतः जलजीवन योजनेंतर्गत सुरू असलेली नळ पाणीपुरवठा योजना, विहिरी आदी ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या.

Web Title: Chief Executive Officer of ZP played with students in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा