धानपिकाच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 10:26 PM2017-11-03T22:26:21+5:302017-11-03T22:26:30+5:30
पूर्व विदर्भातील मुख्य पीक असणारे धानाचे पीक यावर्षी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात मावा व तुडतुड्याने भस्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पूर्व विदर्भातील मुख्य पीक असणारे धानाचे पीक यावर्षी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात मावा व तुडतुड्याने भस्त केले. यामुळे शेतकºयाच्या तोंडचा घास पळविल्या गेल्याची व्यथा आ.कृष्णा गजबे यांच्यासह गोंदिया-भंडाºयाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिल्याचे सांगून मदत देण्याबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही दिली.
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही आ.गजबे यांनी निवेदन देऊन शेतकºयांची परिस्थिती त्यांना सांगितले. शेतकºयांना अशा परिस्थितीत मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री व कृषीमंत्र्यांकडे केली. त्यामुळे २ नोव्हेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी गोंदिया जिल्ह्यातील आमगावचे आमदार संजय पुराम, गोंदिया-भंडाराचे विधान परिषद सदस्य परिणय फुके हेसुद्धा उपस्थित होते. तत्पूर्वी आ.गजबे यांनी जिल्हाधिकाºयांना पंचनाम्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यानंतर यंत्रणा कामी लागली.