आरमोरीतील स्वागताने भारावले मुख्यमंत्री फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:13 PM2019-08-05T23:13:47+5:302019-08-05T23:14:02+5:30

महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आरमोरी येथे आले असता, त्यांनी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले.

Chief Minister Fadnavis welcomed Armoori | आरमोरीतील स्वागताने भारावले मुख्यमंत्री फडणवीस

आरमोरीतील स्वागताने भारावले मुख्यमंत्री फडणवीस

Next
ठळक मुद्देपोरड्डीवार यांच्या प्रांगणात मार्गदर्शन : जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी तत्पर राहण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आरमोरी येथे आले असता, त्यांनी गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांनी त्यांचे भावपूर्ण स्वागत केले. या स्वागताने भारावलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्याच प्रांगणात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना या जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी तत्पर राहण्याची ग्वाही दिली. जनतेचा आशीर्वाद आणि जनादेश घेण्यासाठी तुमच्याकडे आलो असल्याचे सांगितले.
याप्रसंगी आदिवासी विकास राज्यमंत्री परिणय फुके, खासदार अशोक नेते, आमदार गिरीष व्यास, आमदार कृष्णा गजबे, आमदार किर्तीकुमार भांगडिया, गडचिरोली जिल्हा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आरमोरीला येणार असल्याची माहिती मिळताच सायंकाळपासून नागरिकांनी व भाजप कार्यकर्त्यांनी प्रकाश पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी गर्दी केली होती. पण या यात्रेच्या अतिशय व्यस्त कार्यक्रमात मुख्यमंत्री आरमोरीवासियांना वेळ देणार का, अशी शंकाही नागरिकांमध्ये उपस्थित केली जात होती. मात्र महाजनादेश यात्रेचे ब्रह्मपुरीवरून आरमोरी येथे सायंकाळी ७.३० वाजता आगमन झाल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट पोरेड्डीवार यांच्या निवासस्थानी भेट देण्याची सूचना करून त्यांचे प्रांगण गाठले.
जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावून गेल्या पाच वर्षात आम्ही केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडून पुन्हा या महाराष्टÑाला प्रगतीपथावर व विकासाकडे नेण्यासाठी मी येथे आलो आहे. तुमचा आशीर्वाद घेऊनच मी मुंबईला जाणार, असे मुख्यमंत्री म्हणाले. पाऊस सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण आवरते घेत गडचिरोलीकडे प्रयाण केले.
या कार्यक्रमाला माजी आमदार अतुल देशकर, आरमोरीचे नगराध्यक्ष पवन नारनवरे, उपाध्यक्ष हैदरभाई पंजवानी, जि.प. सदस्य संपत आळे, सभापती भारत बावनथडे, सागर मने, सुनिता चांदेवार, जिल्हा बँकेचे संचालक डॉ. दुर्वेश भोयर, कृऊबासचे सभापती क्षिरसागर नाकाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष नंदू पेटेवार, विलास पारधी, पं.स. सदस्य निता ढोरे, नगरसेवक माणिक भोयर, सुनिता मने, संगीता रेवतकर आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Chief Minister Fadnavis welcomed Armoori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.