मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:33 AM2021-03-22T04:33:15+5:302021-03-22T04:33:15+5:30
यांच्या पुढाकाराने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ...
यांच्या पुढाकाराने राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यात मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राच्या आधारे दर महिन्याला शंभर कोटी रुपयांची वसुलीप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य आहे. या प्रकरणाची चाैकशी करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी केली.
महाराष्ट्र राज्याचा सन्मान हनन करण्याचा हा प्रकार आहे. दिवसेंदिवस मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर होत असलेल्या प्रकारामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांवर पोलीस आयुक्तांनी आरोप करणे म्हणजे लाजिरवाणा प्रकार आहे. या सर्व प्रकारची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा, यासाठी निषेध व्यक्त करून भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाने व महाविकास आघाडी सरकार विरोधात नारेबाजीने संपूर्ण शहर
दुमदुमले. यावेळी उपस्थितांना आ. डॉ. होळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, भाजप बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, विनोद गौरकर, विकास मैत्र, भाजप युवा नेते प्रतीक राठी, भोजराज भगत, पंचायत समितीच्या सदस्य चंद्रकला आत्राम, सुरेश कामेलवार,
ज्येष्ठ नेते मनमोहन बंडावार, जयराम चलाख व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.