मार्र्कं डेश्वरांची मुख्य पूजा पालकमंत्र्यांच्या हस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:08 PM2018-02-05T23:08:33+5:302018-02-05T23:08:53+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून जत्रा भरणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
मार्र्कं डादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त १३ फेब्रुवारीपासून जत्रा भरणार आहेत. १३ फेब्रुवारीला येथे राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते पहाटे ४ वाजता मार्र्कंडेश्वरांची मुख्य पूजा होणार आहे, अशी माहिती मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर व सचिव मृत्यूंजय गायकवाड यांनी दिली आहे.
आठ दिवसांनंतर मार्र्कंडादेव येथील यात्रेला सुरूवात होणार असली तरी व्यावसायिकांनी आत्तापासूनच आपले बिऱ्हाड मांडणे सुरू केले आहे. ट्रस्टतर्फे भाविकांसाठी विविध सोयी पुरविल्या जाणार आहेत