बाल न्याय मंडळ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:45 AM2017-09-07T00:45:54+5:302017-09-07T00:46:08+5:30
पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व बालन्याय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात बालन्याय मंडळावर कार्यशाळा रविवारी पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व बालन्याय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक पोलीस अधीक्षक कार्यालयात बालन्याय मंडळावर कार्यशाळा रविवारी पार पडली.
बालन्याय काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ अंतर्गत कायदेशिर तरतूदी, पोलीस विभाग, बालन्याय मंडळ व बालकल्याण समिती यांची कर्तव्य व त्यांची भूमिका, यासोबतच काळजी व संरक्षणाची कावश्यकता असलेले बालक व विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्या पुनर्वसनाबाबत मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूटच्या सामाजिक कार्यकर्त्या ज्योती खांदपाचोळे व दिशा सामाजिक संस्था अमरावतीचे संचालक प्रवीण खांदपाचोळे यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय मेहरे, न्या. टी.के. जगदाळे, न्या. बी.एम. पाटील, न्या. यू.एम. पदवाड, न्या. एस.टी. सूर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी विपीन ईटनकर, बालन्याय मंडळाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश एन.सी. बोेरफळकर, न्या. एन.पी. वासाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच न्यायाधीशवृंद, बालन्याय मंडळाचे सदस्य, पोलीस अधिकारी व कर्मचारी कार्यशाळेला हजर होते.