काेतवालांची अत्यल्प मानधनावर बाेळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:23+5:302021-09-02T05:18:23+5:30
गडचिराेली : महसूल विभागातील शेवटचा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेतवालांची अत्यल्प मानधनावर बाेळवण सुरू आहे. त्यांना मिळणारा चप्पल भत्ता ...
गडचिराेली : महसूल विभागातील शेवटचा घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काेतवालांची अत्यल्प मानधनावर बाेळवण सुरू आहे. त्यांना मिळणारा चप्पल भत्ता बंद करण्यात आला असून शिपाई पदावर पदाेन्नतीचाही पत्ता नाही. एकूणच महसूल विभागात महत्त्वाची भूमिका असलेला काेतवाला शासन व प्रशासनाच्या लेखी उपेक्षितच आहे.
काेतवाल संघटनेच्या वतीने गडचिराेली जिल्ह्यासह राज्यभरात विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन अनेकदा आंदाेलने करण्यात आली. निवेदने देऊन पाठपुरावा करण्यात आला. मात्र काेतवालांच्या मागण्या मार्गी लागल्या नाही. जुन्या ज्येष्ठ काेतवालांना प्रती महिना ७ हजार व नवीन काेतवालांना ५ हजार रुपये मानधन दिले जात आहे.
बाॅक्स ....
२०११ पासून पदाेन्नती नाही
काेतवाल संवर्गातून शिपाई संवर्गात पदाेन्नती गेल्या ११ वर्षांपासून प्रलंबित आहे. गडचिराेली जिल्ह्यात सन २०११ पासून एकाही काेतवालाला शिपाई पदावर पदाेन्नती देण्यात आली नाही. या संदर्भात संघटनेच्या वतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र कार्यवाही झाली नाही. उलट काेतवालांच्या हक्काच्या जागेवर सरळ सेवेने भरती घेण्यात आली. राज्यातील सर्वच जिल्ह्यात नियमित पदाेन्नती हाेत आहे. मात्र काेतवालावर अन्याय हाेत आहे.
बाॅक्स ....
जिल्ह्यात ७९ पदे रिक्त
बाराही तालुके मिळून गडचिराेली जिल्ह्यात महसूल विभागांतर्गत एकूण २३३ महसुली साझे आहेत. या साझांमध्ये २३७ तलाठी आहेत. गडचिराेली जिल्ह्यात तलाठ्यांची एकूण ६९९ पदे मंजूर आहेत. यापैकी ६३१ पदे भरण्यात आली असून अजूनही ७९ पदे रिक्त आहेत. पेसा क्षेत्रामुळे धानाेरा तालुक्यासह अहेरी उपविभागात काेतवालांच्या पदांमध्ये वाढ झाली आहे.
बाॅक्स ...
कामांची यादी भली माेठी
- तलाठ्यांनी सांगितलेली सर्व कामे करणे.
- शेतकरी व संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना नाेटीस पाेहाेचविणे.
- गावातील शेतकऱ्यांकडील शेतसाऱ्याची रक्कम वसूल करणे.
- जमीन सर्वेक्षणाची रक्कम घेऊन पावत्या फाडणे.
- महत्त्वाच्या विषयाची मुनादी देणे.
- निवडणुकीचे काम करणे.
बाॅक्स ....
विविध मागण्या प्रलंबित
- काेविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या काेतवाल कर्मचाऱ्यांना शासनाच्या निर्णयानुसार वारसांना ५० लाखांची मदत द्यावी.
- सेवापुस्तक अद्ययावत करण्यात यावे. अंतिम सेवा ज्येष्ठता यादी जाहीर करावी.
- काेतवाल कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर जीआरनुसार शिल्लक अर्जित रजेची रक्कम देण्यात यावी आदी मागण्या प्रलंबित आहेत.
काेट .....
अपुऱ्या मानधनात कसे भागणार?
गेल्या आठ-दहा वर्षांपासून मी काेतवाल म्हणून महसूल विभागात काम करीत आहे. तलाठी कार्यालयातील कामे करून काेविडच्या काळातही प्रशासनाला मदत केली आहे. मात्र केवळ ५ हजार एवढ्याशा मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह याेग्यरित्या हाेत नाही. शासनाने मानधन वाढ करावी.
- काेतवाल
काेट ...
गेल्या १५ वर्षांपासून मी काेतवाल म्हणून काम करीत आहे. मात्र शासनाच्या वतीने अजूनही आम्हाला पदाेन्नती देण्यात आली नाही. याउलट नियमित मानधनही मिळत नाही. दाेन ते तीन महिन्याचे मानधन थकीत राहत असते.
- काेतवाल