मुलांची खेळाशी गट्टी; अभ्यासाशी कट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:25 AM2021-07-16T04:25:50+5:302021-07-16T04:25:50+5:30
ग्रामीण भागातील मूल मोबाइल शी जोडली नाळ कुरूड : लहान मुलांना पालक नेहमी अभ्यासाचे महत्त्व पटवून ...
ग्रामीण भागातील मूल मोबाइल शी जोडली नाळ
कुरूड : लहान मुलांना पालक नेहमी अभ्यासाचे महत्त्व पटवून देत असतात; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरापासून शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. याचा मोठा फटका ग्रामीण भागातील मुलांना बसला आहे. ग्रामीण भागातील मुलांचे पालक शेतीमध्ये व्यस्त असताना विद्यार्थी घरी राहून खेळाशी गट्टी करून अभ्यासापासून दुरावला आहे.
वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण पद्धत चालू आहे. काही विद्यार्थ्यांनी पालकांना हट्ट करून मोबाइल घ्यायला लावला आहे; पण ग्रामीण भागातील बहुतांश पालकांना मोबाइल समजत नाही. अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या नावाने कार्टून पाहतात किंवा गेम खेळतात. हे चित्र थांबत नसल्याने शाळा सुरू करण्याची मागणी होत आहे. आम्ही तुमच्या वयाचे होतो तेव्हा मन लावून खूप अभ्यास करायचाे, तर काही पालक आम्ही शिकलो नाही; पण तुम्ही तरी शिका, आम्ही अभ्यास केला नाही तर कठोर शिक्षा व्हायची, असेही पालक जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत; पण मोबाइलचा छंद लागलेल्या विद्यार्थी ही बाब मनावर घेत नाही. ग्रामीण भागातील पालक म्हणजे बहुतांश टक्के शेतकरी वर्ग सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतातच वेळ जातो, अशात शेतकरी बाप मुलांना काय शिकवणार, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. मोबाइलसाठी मुले फार हट्टी झाली आहेत. अभ्यासाव्यतिरिक्त मुले ऑनलाइन गेम खेळत असतात. मुलांच्या हातातून मोबाइल घेतला तर चिडचिड करतात. यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी शाळा आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया काेंढाळा येथील पालक धनराज शेंडे यांनी कळविली आहे.
150721\img_20210715_110719.jpg
घरी राहून मोबाईल वापर