विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 11:58 PM2018-08-26T23:58:44+5:302018-08-26T23:59:39+5:30

चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथील ७ वर्षाच्या बालकाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रफुल्ल मोरेश्वर पिपरे (७) असे मृतक बालकाचे नाव आहे.

Child's death by electricity shocks | विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनवतळा येथील घटना : करंट असलेल्या लोखंडी ड्रमला स्पर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील नवतळा येथील ७ वर्षाच्या बालकाला विजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
प्रफुल्ल मोरेश्वर पिपरे (७) असे मृतक बालकाचे नाव आहे. प्रफुल्ल हा लाकडी पलंगावर अभ्यास करीत होता. अभ्यास करताना टीव्ही सुरू करण्यासाठी गेला. टीव्ही ड्रमवर ठेवली होती. टीव्ही सुरू करीत असताना करंट असलेल्या ड्रमला त्याचा स्पर्श झाला. काही वेळ प्रफुल्लचा उजवा पाय ड्रमला चिकटून होता व जागीच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती पोलीस पाटलांनी चामोर्शी पोलीस स्टेशनला दिली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश घोडाम, पोलीस हवालदार राजकुमार चिंचेकर, पोलीस रायटर मनोहर हलामी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रफुल्लची मोठी बहिण तिसऱ्या वर्गात शिकत आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यास उत्सूक असताना राखी बांधण्यापूर्वीच भावाचा मृत्यू झाला. प्रफुल्लच्या एकाकी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. लोखंडी वस्तूला विजेचा वायर स्पर्श होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना याबाबतची माहिती राहत नाही. वीज विभागाने जनजागृती करणे आवश्यक आहे.

Web Title: Child's death by electricity shocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.