२१ मॉडेलची राज्यस्तरासाठी निवड

By admin | Published: August 11, 2015 02:06 AM2015-08-11T02:06:51+5:302015-08-11T02:06:51+5:30

स्थानिक शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून राज्यस्तरासाठी २१ प्रतिकृतींची

The choice of state model for 21 models | २१ मॉडेलची राज्यस्तरासाठी निवड

२१ मॉडेलची राज्यस्तरासाठी निवड

Next

गडचिरोली : स्थानिक शिवाजी महाविद्यालयात पार पडलेल्या इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनातून राज्यस्तरासाठी २१ प्रतिकृतींची निवड करण्यात आली व सोमवारी या विज्ञान प्रदर्शनीचा समारोप झाला.
समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. उपाध्यक्ष जीवन नाट होते. मुख्य अतिथी म्हणून आदिवासी विकास खात्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सीईओ संपदा मेहता, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री, सिनेट सदस्य प्रकाश गेडाम, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरासाठी प्रतिकृती निवड करण्यात आलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक, विद्यार्थ्यासह सर्व घटकांनी वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगून पर्यावरणपुरक विज्ञान स्वीकारावे जेणेकरून भविष्यात विज्ञानाचा वापरामुळे नुकसान पोहोचणार नाही, असे पालकमंत्री आत्राम यावेळी सांगितले.
राज्यस्तरासाठी निवड झालेल्या मॉडेलमध्ये देसाईगंज येथील प्रगती हायस्कूलचा विद्यार्थी पियूष किशोर कुमरे, विसोरा येथील विनायक विद्यालयाचा विद्यार्थी अश्विन राष्ट्रपाल डांगे, चामोर्शी तालुक्यातील बहाद्दूरपूर येथील नेताजी हायस्कूलची विद्यार्थिनी चंद्रकला सूर्या मोडी, कारमेल अकॅडमी चामोर्शीचा विद्यार्थी रचित प्रशांत कोटगीरवार, शिवाजी हायस्कूल चामोर्शीचा विद्यार्थी सोहन गुणवंत वनकर, देशबंधू चित्तरंजनदास येनापूरचा विद्यार्थी अनिकेश खोकन मंडल, राजीव गांधी विद्यालय सोनापूरचा विद्यार्थी निखील राजू शेंडे, प्रियदर्शनी विद्यालय धानोराचा विद्यार्थी सुरज दिनकर सूर्यवंशी, तिरूपती विद्यालय कोकडीचा विद्यार्थी अमोल देवाजी बन्सोड, गोंडवाना सैनिक विद्यालय गडचिरोलीचा विद्यार्थी प्रतिक भास्कर कलाम, राजे धर्मराव हायस्कूल अहेरीचा विद्यार्थी प्रेमदास बोरूले, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गुरवळाचा विद्यार्थी भूषण यादव बांबोळे, मुलचेरा तालुक्यातील सुंदरनगर येथील नेताजी हायस्कूलचा विद्यार्थी संदीप दुलाल मंडल, राजे धर्मराव हायस्कूल नागेपल्लीचा विद्यार्थी ज्ञानेश्वर बंडू मोहुर्ले, जवाहरलाल नेहरू नगर परिषद शाळा गडचिरोलीची विद्यार्थिनी पायल अरविंद नैताम, चामोर्शी तालुक्यातील रविंद्रपूर येथील रविंद्रनाथ टागोर हायस्कूलची विद्यार्थिनी पूजा मनोहर मंडल, चामोर्शी तालुक्यातील माल्लेरमाल येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थिनी रिना नरेंद्र मोहुर्ले, नंदीगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी सपना दुर्गू मुहंदा, धानोरा तालुक्यातील मॉडेल स्कूल मोहलीचा विद्यार्थी अभय धनिराम कोराडे, आरमोरी येथील विवेकानंद विद्यालयाचा विद्यार्थी यज्ञ श्रीपद वाटे व धर्मराव कृषी विद्यालय अहेरीची विद्यार्थिनी माहेश्वरी चिन्नम आलाम यांच्या प्रतिकृतींची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे. समारोप कार्यक्रमाचे संचालन अनिल काळे, प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी नानाजी आत्राम तर आभार मानिक साखरे यांनी मानले.

Web Title: The choice of state model for 21 models

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.