महापारेषणमधील संरचनेच्या परिपत्रकाची हाेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:13+5:302021-07-01T04:25:13+5:30
महापारेषण कंपनीने २०१७ मध्ये जाहीर केलेले कर्मचाऱ्यांच्या संरचनेचे प्रस्तावित धोरण हे कर्मचारीविरोधी आहे. या धाेरणामुळे मनुष्यबळ कमी होत असल्याने ...
महापारेषण कंपनीने २०१७ मध्ये जाहीर केलेले कर्मचाऱ्यांच्या संरचनेचे प्रस्तावित धोरण हे कर्मचारीविरोधी आहे. या धाेरणामुळे मनुष्यबळ कमी होत असल्याने ग्राहकाभिमुख सेवा देण्यास अडचणी निर्माण हाेण्याचा धाेका हाेता. त्यामुळे एसईए संघटनेने विरोध दर्शविला होता. या विषयावर चर्चा होऊन संघटनेने सुचविलेले पर्याय समाविष्ट करून नंतरच संरचना करावी, अशी संघटनेची मागणी होती. तसेच तोपर्यंत संरचना लागू करू नये, अशी संघटनेची भूमिका होती. ग्राहकांना योग्य सेवा मिळावी म्हणून एसईए संघटनेने प्रस्तावित संरचनेला विरोध करून संरचनेबाबत संघटनेशी चर्चा करून ती सुधारित करण्याची मागणी २६ जून राेजी पत्राद्वारे केली. पोटेगाव मार्गावरील ऊर्जागड मंडळ कार्यालयासमोर महावितरण व महापारेषण या दोन्ही कंपन्यांतील एसईए संघटनेच्या सदस्यांनी संयुक्त द्वारसभा घेऊन परिपत्रकाची होळी करून प्रस्तावित महापारेषण संरचनेला विरोध दर्शविला. महावितरणतर्फे सहसचिव पुरुषोत्तम वंजारी व महापारेषणतर्फे अभियंता विजय चाचेरे यांनी द्वारसभेला संबोधित केले. याप्रसंगी बहुसंख्य अभियंते उपस्थित हाेते.
बाॅक्स
संरचनेमुळे अभियंत्यांची मंजूर पदे झाली कमी
महापारेषणच्या एकतर्फी निर्णयामुळे संपूर्ण देशाला ग्रीडमधून वीज पुरवठा करणाऱ्या मोठ्या उच्चदाब उपकेंद्रांमध्ये अनुभवी अभियंत्यांची मंजूर पदे कमी केली आहेत. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्रीड फेल होऊन मुंबई व सभोवतालच्या परिसरात अंधार पसरला हाेता. असेच संकट भविष्यात राज्यावर येऊ शकते. महापारेषणची नवीन संरचना अभियंत्यांची पदे कमी करणारी व विद्युत समस्या अधिक बिकट करणारी आहे, असेही संघटनेने म्हटले आहे.
===Photopath===
300621\30gad_1_30062021_30.jpg
===Caption===
महापारेषणच्या परिपत्रकाची हाेळी करताना संघटनेचे सदस्य.