आष्टीत रक्तदानासाठी सरसावले सर्व स्तरातील नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:36 AM2021-07-29T04:36:28+5:302021-07-29T04:36:28+5:30
शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे होते. प्रमुख ...
शिबिराचे उद्घाटन जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच बेबी बुरांडे, पं. स. सदस्य शंकर आकरेड्डीवार, मार्कंडाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी भारती राऊत, सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार , माजी पोलीस पाटील शंकर मारशेट्टीवार, ग्रा. पं. सदस्य आशिष बावणे, आनंद कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमेंद्र दामोदरे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सुरुवातीला स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मार्गदर्शन करताना जि. प. सदस्य रूपाली पंदिलवार यांनी ‘लोकमत’च्या उपक्रमाचे कौतुक केले. गरजू व्यक्तींसाठी रक्तदात्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना बाबूराव कोहळे म्हणाले, लोकमतने सामाजिक बांधीलकी जोपासून नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. अनेक वर्षांपासून लोकमतचे वर्षभर विविध कार्यक्रम सुरू असतात. आष्टीतील रक्तदान शिबिराच्या आयोजनाबद्दल त्यांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.डॉ. भारत पांडे यांनी केले. प्रास्तावित लोकमतचे प्रतिनिधी सुधीर फरकाडे यांनी केले. आभार विशाल बंडावार यांनी मानले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय विकास मंचचे कार्यकर्ते तसेच युवा संकल्प संस्था शाखा आष्टीच्या सदस्यांनी सहकार्य केले. तसेच रक्तपेढी तंत्रज्ञ विवेक घोनाडे, प्रशिक मेश्राम, नीलेश सोनवणे, पी. व्ही. देशमुख, स्वप्निल चापले, बी. डी. घोरडवार, रूपेश दहाडे, आदींनी सहकार्य केले. रक्तदात्यांसाठी नाश्टा, चहा, बिस्कीटची व्यवस्था संजय पंदीलवार यांनी केली.
(बॉक्स)
पंदीलवार, आरएफओ पवार यांचे रक्तदान
या शिबिरात सामाजिक कार्यकर्ते संजय पंदीलवार यांनी स्वतः रक्तदान केले. याशिवाय जवळपास १५ जणांना रक्तदानासाठी तयार करून सहकार्य केले. पोलीस विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांनीही रक्तदानासाठी पुढाकार घेतला. तसेच चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष पवार यांनी स्वत: रक्तदान केले. याशिवाय वनविभागाच्या सहा कर्मचाऱ्यांनीही रक्तदान करून आपले योगदान दिले.
(बॉक्स)
यांनी जोपासली सामाजिक बांधीलकी
या शिबिरात संजय पंदीलवार, मनीष पवार, प्रा. नारायण सालुरकर, डॉ. वैभव जुमनाके, डॉ. प्रशांत धाकडे, सागर गोनपल्लीवार, विनय कल्लुरवार, जितेंद्र काळे, रवींद्र मेंदाळे, राजू पंचफुलीवार, सतीश चिपावार, कुशाल नागुलवार, पंकज येलमुले, हर्ष कोडापे, अनुप सिंह, अक्षय कल्लाशपवार, शुभम पांढरमिळे, अमोल मंथनवार, नवरत्न सोनवाने, दिलीप मिच्छा, मोतीराम मडावी, चंदू शेमले, विवेक गोंगले, अशरूस दुर्गे, अंकुश गलबले, अथर्व फरकाडे, विक्की बावणे, भास्कर बामनकर, रोहित भोयर, हरीष पांडे, संतोष नागरगोजे, अमोल क्षीरसागर, आदींनी रक्तदान केले.