वनहक्कासाठी नागरिकांची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 12:01 AM2018-01-06T00:01:23+5:302018-01-06T00:02:43+5:30
वनहक्क कायद्यांतर्गत नागरिकांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण तत्काळ करावे, यासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.
Next
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : जनहितवादी समिती तथा ग्रामसंघाचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वनहक्क कायद्यांतर्गत नागरिकांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण तत्काळ करावे, यासह इतर मागण्यांसाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे.
सूरजागड लोह प्रकल्पात पेसा कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. गौण वनोपज व वन संपदेचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर प्रतिबंध घालावा आदी मागण्यांसाठी ५ जानेवारीपासून आंदोलन केले जात आहे. सदर आंदोलनाचे नेतृत्त्व सुरेश बारसागडे, माधव गावडे, बंडू मट्टामी, मधुकर पुडो, बांडू गावडे, केशव पुडो, निर्मल गोटा करीत आहेत.