गडचिरोलीतील नागरिक डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत मदतीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:21 PM2020-04-17T17:21:37+5:302020-04-17T17:23:01+5:30
यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील २५० हून अधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या भेंडाळा येथे गेल्या २० दिवसांपासून रहात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील २५० हून अधिक मजूर गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या भेंडाळा येथे गेल्या २० दिवसांपासून रहात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरी व हाताला मिळेल ते क ाम क रून हे लोक आपले पोट भरत. जेवढे हातात होते तेवढे पैसे संपले आहेत आणि जवळचे धान्यही संपले आहे अशा अवस्थेत हे लोक जीवन जगत आहेत. गेल्या दहा दिवसांपूर्वी शासनाकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांना करण्यात आला. पण हे सगळेच साहित्य निकृष्ट दजार् चे होते असे या नागरिकांचे म्हणणे होते. हा निकृष्ट शााठाही आता संपला आहे व या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. एकमेकांकडे जे जास्तीचे शिल्लक आहे ते मागून त्यांची गुजराण सुरू आहे. नागरिकांचे एकच मागणे आहे की, आम्हाला आमच्या गावाला पाठवा नाहीतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य पद्धतीने करावा. येथे एक गर्भवती महिलाही रहात असल्याचे कळते.