नागरिकांना मिळाले जातीचे दाखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:39 AM2021-09-25T04:39:41+5:302021-09-25T04:39:41+5:30
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार धर्मरावबाबा आत्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी ...
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार धर्मरावबाबा आत्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय मनोगतात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले की, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीच्या दाखल्याची गरज असते. हा दाखला मिळविण्यासाठी गोरगरीब व दुर्गम भागातील जनतेची मोठी दमछाक होते. त्यामुळेच मोठ्या संख्येने जातीचे दाखले तयार करून ते नागरिकांना वितरित केले जाणार आहेत.
तहसीलदार ओंकार ओतारी यांनी शासनाच्या कल्याणकारी व लोकाभिमुख योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकाला मिळण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाईल, असे सांगितले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी काही निवडक नागरिकांना यावेळी जातीचा दाखला व रेशनकार्ड वितरित करून महाराजस्व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गावातील तलाठी व महसूल विभागातील कर्मचारी ग्रामस्थांना घरपोच दाखले वितरित करणार आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रियाज शेख, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल मुक्कावार, सुरेंद्र अलोने, श्रीनिवास विरगोनवार, राहुल गर्गम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी शिल्पा दरेकर, रोशन दरडे, एकनाथ चांदेकर, सत्यनारायण येनबडवार, विनोद दहागावकर, विनोद इसनकर, किशोर तलांडी, किशोर दुर्गे यांनी सहकार्य केले.
240921\img-20210924-wa0158.jpg
अहेरी तहसील कार्यालयात महाराजस्व अभियानाचे शुभारंभ प्रसंगी दाखले वाटप करताना धर्मरावबाबा आत्राम