दाखल्यांसाठी नागरिकांचे दाेन तालुक्यात हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:36 AM2021-03-19T04:36:11+5:302021-03-19T04:36:11+5:30
२०११च्या जनगणनेनुसार सिंगणपेठ गावात ६७ कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील लोकसंख्या २३३ आहे. यामध्ये पुरुष ११८ व स्त्रिया ११५ ...
२०११च्या जनगणनेनुसार सिंगणपेठ गावात ६७ कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील लोकसंख्या २३३ आहे. यामध्ये पुरुष ११८ व स्त्रिया ११५ आहेत. टिकेपल्ली गावात ८८ कुटुंब असून, तेथील लोकसंख्या ३५३ आहे. यामध्ये १७१ पुरुष, तर १८२ स्त्रिया आहेत. नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे प्राप्त करण्यासाठी दोन्ही ठिकाणी जावे लागते. यात बराचसा वेळ व पैसा खर्च करावा लागतो. अतिवृष्टीची भरपाई, निवडणूक संदर्भ, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, पीककर्ज माफी यासारख्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्रामसेवक व पटवारी या दोघांची गरज असते. परंतु दोन तालुक्याच्या फेऱ्या मारण्यातच गावातील नागरिकांचा वेळ जाताे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यावर योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.