गॅस कनेक्शनसाठी नागरिकांची गॅस एजन्सीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 09:22 PM2019-06-10T21:22:02+5:302019-06-10T21:22:22+5:30

भाजप प्रणीत केंद्र सरकारने धूरविरहीत स्वयंपाक करण्यासाठी महिलांकरिता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत सुरूवातीच्या टप्प्यात गॅस कनेक्शन गतीने देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस एजन्सीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गॅस कनेक्शनच्या कारवाई दिरंगाई झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी सोमवारी गडचिरोली येथे भारत गॅस एजन्सीवर धडक देऊन रोष व्यक्त केला.

Citizens hit gas for gas connection | गॅस कनेक्शनसाठी नागरिकांची गॅस एजन्सीवर धडक

गॅस कनेक्शनसाठी नागरिकांची गॅस एजन्सीवर धडक

Next
ठळक मुद्देमहिला आक्रमक : उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळण्यास दिरंगाई; व्यवस्थापकांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजप प्रणीत केंद्र सरकारने धूरविरहीत स्वयंपाक करण्यासाठी महिलांकरिता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत सुरूवातीच्या टप्प्यात गॅस कनेक्शन गतीने देण्यात आले. मात्र त्यानंतर गॅस एजन्सीच्या नियोजन शून्य कारभारामुळे गॅस कनेक्शनच्या कारवाई दिरंगाई झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला व नागरिकांनी सोमवारी गडचिरोली येथे भारत गॅस एजन्सीवर धडक देऊन रोष व्यक्त केला.
सावली पं.स.चे सदस्य विजय कोरेकार यांच्या नेतृत्वात गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी गॅस कनेक्शन मिळण्यासाठी संबंधित एजन्सीकडे अर्ज सादर केले. सोबत सर्व दस्तावेज सादर केले. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या यादीत शेकडो लाभार्थ्यांची नावे होती. नाव असलेले अनेक लाभार्थी गॅस कनेक्शनसाठी गॅस एजन्सीमध्ये येऊन वारंवार चौकशी करीत होते. मात्र गॅस कनेक्शन त्यांना देण्यात येत नव्हते. त्यामुळे लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीवर धडक देऊन गॅस कनेक्शन तत्काळ देण्याची मागणी केली. यावेळी राजकुमार एजन्सीच्या व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. सदर गॅस एजन्सीकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या नावांची नोंद असल्यामुळे दुसऱ्या एजन्सीकडे नावाची नोंद करता येत नाही. त्यामुळे प्रधानमंत्री गॅस योजनेतील पात्र लाभार्थ्यांना तत्काळ गॅस कनेक्शन व साहित्य देण्यात यावे, अशी मागणी केली.
यावेळी प्रेमिला नेरडवार, वर्षा सिधमवार, अर्चना आत्राम, मिरा लोणबले, कमल कटकमवार, बेबी पेंदोर, शशीबाई चिदमवार, शिका आलाम, पुष्पा दळांजे, प्रेमिला सहारे, अनुसया कुरूडकार, विमल सोनबावणे, गौराबाई मडावी, इंदुबाई सिडाम, माया कुमरे, अर्चना कोकोडे, आशा मडावी, मैना मांदाळे, संगीता मोहुर्ले, सुरेखा गावतुरे, शांता गेडाम, उषा सिडाम, उषा कस्तुरे, वनीता भोयर, मंगला नैताम आदी हजर होत्या.
घरपोच सिलिंडर डिलीव्हरी प्रभावित
सदर गॅस एजन्सीच्या वतीने गेल्या १५ ते २० दिवसांपासून गॅस कनेक्शन ग्राहकांना योग्य सेवा दिली जात नसल्याने अनेक ग्राहक गॅस एजन्सीमध्ये येऊन ओरडून जातात. गडचिरोली शहरात या गॅस एजन्सीच्या वतीने घरपोच सिलिंडर पोहोचविण्याची सेवा देण्यात येत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या घरपोच डिलिव्हरीला ब्रेक लागला आहे. सदर गॅस एजन्सीमध्ये गडचिरोली शहरासह चांभार्डा, अमिर्झा व संपूर्ण तालुक्यातील ग्राहक संलग्नित आहेत. सदर एजन्सीमध्ये गेल्या आठ ते १० दिवसांपासून उपलब्ध नसल्याने अनेक ग्राहक रिकाम्या हाताने परत जात आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन सुधारणा करण्याची मागणी आहे.

Web Title: Citizens hit gas for gas connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.