प्रस्तावित लाेहखाणींना नागरिकांचा विराेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:42 AM2021-08-14T04:42:22+5:302021-08-14T04:42:22+5:30
सरपंच संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. समस्यांचे निराकरण १५ दिवसांच्या आत न केल्यास सरपंच-उपसरपंच संघटनेच्यावतीने आंदोलन ...
सरपंच संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. समस्यांचे निराकरण १५ दिवसांच्या आत न केल्यास सरपंच-उपसरपंच संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना सरपंच संघटनेचे अध्यक्ष धनीराम हिडामी, उपाध्यक्ष परमेश्वर लोहंबरे, सचिव दिलीप केरामी, सल्लागार सियाराम हलामी, सल्लागार नंदू वैरागडे, कोषाध्यक्ष वीरेंद्र जांभुळकर, तालुका संघटक मोहन कुमरे, तालुका संघटक सुनील सयाम, गांगसाय मडावी,किशोर नरोटे,सुनील मडावी, छाया बोगा, प्रेमदास गोटा, सुनीता मडावी उपस्थित होते.
बाॅक्स
या आहेत प्रमुख मागण्या
कोरची तालुक्यातील प्रस्तावित असलेले लोहप्रकल्प नामंजूर करून रद्द करावे, तालुक्यातील विविध भागातील उखडलेले रस्ते तात्काळ दुरुस्त करावे, तालुक्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होताे तो दुरुस्त करावा, अल्प पर्जन्यामुळे शेती व्यवसाय संकटात आहे त्यामुळे तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा. ग्रामपंचायतमधील पथदिव्यांचे बिल शासनाने भरावे. सरपंच व उपसरपंच यांची तहसीलदारांनी दर महिन्याला बैठक घ्यावी, खासगी माेबाईल टाॅवर निर्माण करावे, ग्रामपंचायतमधील बॅँक खाते सरपंच व सचिव यांच्या संयुक्त नावे करावे यासह २९ मागण्यांचा समावेश निवेदनात हाेता.