रेगुंठा परिसरातील नागरिक तेलंगणातील कव्हरेजवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:16+5:302021-03-09T04:39:16+5:30
सिरोंचा : तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे ...
सिरोंचा : तालुक्यात रेगुंठा परिसरात भ्रमणध्वनी टॉवर नसल्याने ग्राहकांना तेलंगणा राज्यातील नेटवर्कवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे रेगुंठा येथे बीएसएनएलचे टॉवर उभारून फोर-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रेगुंठा परिसरात कोटापल्ली, नरसिंहापल्ली, मोयाबिनपेठा, मूलदिम्या, येल्ला, पिरमिडा, दर्शेवाडा, पर्सेवाडा, चिक्याला, बोकटगुडम, आदी गावांचा समावेश आहे. या गावांतील बीएसएनएल ग्राहकांना तेलंगणा राज्यातील कव्हरेजवर अवलंबून राहावे लागत आहे. रेगुंठा येथून बऱ्याच अंतरावर तेलंगणा परिसर आहे. नागरिकांसाठी मोबाईल ही अत्यावश्यक झाली आहे. अनेकजण ऑनलॉईन कामे मोबाईलवरच करतात. ग्रामीण भागातही वापर वाढला आहे. त्यामुळे रेगुंठा येथे बीएसएनएल टॉवर निर्माण करून फोर-जी सेवा द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
झिंगानूर परिसरात दूरसंचार सेवेची समस्या बिकट बनली आहे. या भागात माेबाईलधारक वाढले असले तरी पाहिजे तशी सेवा मिळत नसल्याने संवाद साधण्यास अडचणी येत आहेत.