दुर्गम भागातील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:42 AM2021-09-24T04:42:51+5:302021-09-24T04:42:51+5:30
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात गुड्डीगुडम परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी मीणा यांना निवेदन सादर केले. निवेदनात, अहेरी ...
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या नेतृत्वात गुड्डीगुडम परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी मीणा यांना निवेदन सादर केले. निवेदनात, अहेरी विधानसभा क्षेत्रात येणारे अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचा व मुलचेरा या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी २००५ पूर्वी वनजमिनीवर अतिक्रमण करून, ते उपजीविका करीत हाेते. आजतागायत ते उपजीविका करीत आहेत. त्यामुळे सर्व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांच्या वनजमिनीची मोजणी करून, वनहक्क पट्ट्यांकरिता लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मीणा यांनी वरील विषयांवर सखोल चर्चा केली व संबंधित विभागांना निर्देश देऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, ॲड. आर. एम. मेंगनवार, राविकाॅंचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, लक्ष्मण येर्रावार, बालाजी गावडे, वामन मडावी, हनमंतू आदे, प्रवीण कोटरंगे, संजय गुरनुले, दिलीप सोनुले, गजानन ठाकरे, गणेश गुरनुले, विनोद ठाकरे, किष्टाय्या केशाबोईना उपस्थित होते.
बाॅक्स
विद्युत उपकेंद्र निर्माण करा
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथे मंजूर असलेल्या ३३ के.व्ही. विद्युत केंद्राचे बांधकाम लवकर सुरू करावे, नवेगाव (वेल.) येथे नवीन ३३ के.व्ही. विद्युत उपकेंद्र मंजूर करणे, पेरमिली येथील महसूल मंडलात नायब तहसीलदारांची नियुक्ती करणे. तुमीरकसा गावाला महसूल गाव घोषित करावे, कोडसेपल्ली, कोरेल्ली (बु.), नवेगाव (वेल), छल्लेवाडा आदी गावांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, बोटलाचेरू येथे नवीन धान्य खरेदी गोदाम मंजूर करावे, आदी मागण्यांकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले.
210921\28570841img-20210917-wa0034.jpg
जिल्हा अधिकारी यांच्या समोर समस्यांच्या पाडा...
छाया.. जिल्हाअधिकारी यांना निवेदन देताना...