गडचिराेलीसह दुर्गम भागातही रक्तदानासाठी सरसावले नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:23 AM2021-07-12T04:23:30+5:302021-07-12T04:23:30+5:30

‘लाेकमत’ व सामाजिक बांधिलकचे अतूट नाते गडचिराेली : सामाजिक बांधिलकी हा शब्द उच्चारणे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे यात खूप ...

Citizens rushed to donate blood even in remote areas including Gadchiraeli | गडचिराेलीसह दुर्गम भागातही रक्तदानासाठी सरसावले नागरिक

गडचिराेलीसह दुर्गम भागातही रक्तदानासाठी सरसावले नागरिक

Next

‘लाेकमत’ व सामाजिक बांधिलकचे अतूट नाते

गडचिराेली : सामाजिक बांधिलकी हा शब्द उच्चारणे व प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे यात खूप माेठा फरक आहे. मात्र ‘लाेकमत’ने अगदी सुरुवातीपासूनच सामाजिक बांधिलकीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली आहे. रक्तदान शिबिरे आयाेजित करणे हा सामाजिक बांधिलकीचा एक भाग आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पाेरेड्डीवार यांनी केले.

‘लाेकमत’ व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने बॅंकेच्या सभागृहात रविवारी रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अरविंद सावकार पाेरेड्डीवार यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र चाैधरी आदी मान्यवर उपस्थित हाेते.

पुढे मार्गदर्शन करताना पाेरेड्डीवार म्हणाले, काेराेनामुळे माणूस माणसापासून दूर जात आहे. आईची गळाभेट घेतानासुद्धा काेराेनाची शंका मनात उपस्थित हाेते. बॅंक कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत माेडतात. बॅंक कर्मचाऱ्यांनी दीड वर्षाच्या कालावधीत स्वत:ला झाेकून दिले. काेणताही भेदभाव न करता बॅंक कर्मचारी आपले काम करतात. काेराेनाच्या कालावधीत अनेक बॅंक कर्मचारी पाॅझिटिव्ह आले. मात्र त्यांनी हिंमत साेडली नाही. त्यांचे हे कार्य समाजाला दिशा देणारे आहे, असे मार्गदर्शन केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी मार्गदर्शन करताना ‘लाेकमत’च्यावतीने बुर्गीसारख्या दुर्गम भागातही रक्तदान शिबिराचे आयाेजन केले जात आहे, यावरून ‘लाेकमत’ वृत्तपत्र दुर्गम भागापर्यंत पाेहाेचले असल्याचा पुरावा आहे. समाजाला दिशा देण्याचे काम ‘लाेकमत’ने केले आहे, असे मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन, तर संचालन व आभारप्रदर्शन ‘लाेकमत’चे जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजणे यांनी केले.

बाॅक्स .......

गडचिराेलीत २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

बॅंकेत आयाेजित रक्तदान शिबिरात २८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. अनिरुद्ध धकाते, गोपाल निखाडे, सुधीर देवतळे, वैशाली विधाते, रूपेश ठाकरे, रमेश कोलते, संकेत पोरेड्डीवार, प्रणय अवसरे, प्रकाश अवसरे, नीलेश येरमे, अनमोल गुरनुले, किरण सांबरे, जगन्नाथ इंगोले, गणेश हिवरकर, सचिन होळी, संतोष बोलूवार, महेश दोनाडकर, वरुण धोडरे, गुणवंत दहिकर, नवीन रामगाैनीवार, दिलीप माणुसमारे आदींनी रक्तदान केले.

बाॅक्स

बुर्गीत २९ जणांचे रक्तदान

लाेकमत वृत्तपत्र समूह व जिल्हा पाेलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हेडरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी संकेत गाेसावी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस मदत केंद्र बुर्गी येथे ११ जुलै राेजी रक्तदान शिबिराचे आयाेजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआरपीएफ १९२ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अतुलप्रताप सिंग हाेते. प्रमुख अतिथी म्हणून एटापल्लीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, अहेरी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. रवींद्र वाढाेरे, डाॅ. सचिन कन्नाके, रक्तपेढी तंत्रज्ञ सरिता वाघ, शिरीन कुरेशी, बुर्गी पाेलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पाेलीस उपनिरीक्षक कैलास आलुरे, पीएसआय दशरथ बुरकुल, संदीप व्हस्काेटी, सुरेश पाेटे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

रक्तदान शिबिर आयाेजित करण्यासाठी ‘लाेकमत’चे एटापल्ली तालुका प्रतिनिधी रवी रामगुंडेवार, अहेरीचे प्रतिनिधी प्रतीक मुधाेळकर यांनी सहकार्य केले.

२९ जणांनी केले रक्तदान

एटापल्लीचे तहसीलदार प्रदीप शेवाळे, बुर्गी पाेलीस मदत केंद्राचे पीएसआय कैलास आलुरे, दशरथ बुरकुल, संदीप व्हस्काेटी, पाेलीस हवालदार रामलू मट्टामी, नाेपाेशी पद्माकर सिडाम, पाेलीस शिपाई मुनेश्वर वाकडाेतपवार, दिपकर मंडल, सुगनाकर वेलादी, सचिन कुमरे, कुमारशहा काटेंगे, धनराज उईके, निकेश मडकाम, रामा मडे, कैलाश काेवासे, किशाेर मारगाये, सतीश गाेटा, हितेश नैताम, किरण मट्टामी यांनी रक्तदान केले. तसेच एसआरपीएफचे व्ही पाटील, पी. डी. पवार, डी. एन. रिठे, एस. आर. बेडगुडे, ए. डी. जाधव, डी. एम. मुठे सीआरपीएफ १९२ बटालियनचे हरीश साेम, अजय पांडे, समीर मिया, आर. सरवनम यांनी रक्तदान केले.

Web Title: Citizens rushed to donate blood even in remote areas including Gadchiraeli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.