नागरिकांनी विशेष साहाय्य योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:25 AM2021-07-01T04:25:00+5:302021-07-01T04:25:00+5:30
२९ जून रोजी तहसील कार्यालय चामोर्शी येथे विशेष साहाय्य योजनेंतर्गत तहसील कार्यालय चामोर्शी येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ...
२९ जून रोजी तहसील कार्यालय चामोर्शी येथे विशेष साहाय्य योजनेंतर्गत तहसील कार्यालय चामोर्शी येथे सभा घेण्यात आली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
सभेला तहसीलदार दिलीप दुधबळे, विलास ठोंबरे, पुंडलिक भांडेकर, अमित यासलवार, अमोल तुरे, शंकरराव मारशेट्टीवार, लिपिक देवांगना सहारे आदी उपस्थित होते. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या राज्य पुरस्कृत विशेष साहाय्य योजना आहेत, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना या केंद्र पुरस्कृत विशेष साहाय्य योजना आहेत. सदर सर्व योजना शासनस्तरावर निरंतर सुरू आहेत, असे तहसीलदार शिकतोडे यांनी सांगितले.
बाॅक्स :
निराधार योजनेच्या सभेत ९४ प्रकरणे मंजूर
सभेत विशेष साहाय्य योजनेची एकूण ९८ प्रकरणे मंजुरीसाठी ठेवण्यात आल. होते. त्यापैकी ९४ प्रकरणे मंजूर करण्यात आल. असून, ४ प्रकरणे नामंजूर झाले आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेची एकूण २८ प्रकरणे मंजुरीसाठी होती. यापैकी २७ मंजूर, तर १ प्रकरण नामंजूर झाले. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे एकूण ५२ प्रकरणे मंजुरीसाठी होती. त्यापैकी ५१ प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजनेचे १६ प्रकरणे मंजुरीसाठी होती. यापैकी १४ मंजूर, २ नामंजूर झाली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजने सर्वच दाेन प्रकरणे मंजूर करण्यात आली. ९८ प्रकरणांपैकी ९४ मंजूर करण्यात येऊन ४ प्रकरणे नामंजूर करण्यात आली.
===Photopath===
300621\img-20210630-wa0128.jpg
===Caption===
तहसील कार्यालय येथील सभेचा फोटो